9 January 2025 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ६०० कोटीची आर्थिक मदत | कामगारांना पगारही मिळणार

ST Mahamandal

मुंबई, ०९ जून | महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी (ST) गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन यामुळे एसटीची वाहतूक सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती. त्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागू झाला. आता कुठे पुन्हा 50 टक्के आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. या सर्वांचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न समोर आला. आता राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याने एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे.

एसटीला आर्थिक मदत मिळावी म्हणून एसटी महामंडळाने शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनंदिन खर्चासाठी 600 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभाचे अप्पर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष् व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

 

News English Summary: ST Mahamandal has been in financial crisis for the last several years. The state government has announced financial assistance to get the ST Corporation out of financial difficulties. The state government has announced financial assistance of Rs 600 crore to ST Corporation, said Anil Parab, Minister of State for Transport and President of ST Corporation.

News English Title: State govt announced financial assistance of 600 crore to ST Mahamandal news updates.

हॅशटॅग्स

#STMahamandal(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x