5 November 2024 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांना ५०० रु आणि SMS आला स्वस्थ रहा!

Lock Down, Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, ३ एप्रिल: जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपयांची रक्कम ३ एप्रिलपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. बँक आपल्या खातेधारकांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना देत आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या जनधन खातेधारकांना एसएमएस पाठवून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्हाला तुमची चिंता आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेअंतर्गत पीएमजेडीवायच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ महिन्यांसाठी ५०० रुपये दरमहा जमा होणार आहेत. तुम्हाला पैसे काढण्याची तारीख आणि वेळ कळवली जाईल. तुम्हाला विनंती आहे की, तुम्हाला दिलेली तारीख आणि वेळेनुसार बँकेच्या शाखेत किंवा बँक मित्रांशी संपर्क करा. सावध राहा, स्वस्थ रहा-धन्यवाद.

कोणत्या जनधन बँक खात्यात कधी येणार पैसे?

  1. खाते क्रमांकाच्या शेवटी ० किंवा १ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात आज म्हणजेच ३ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
  2. खाते क्रमांकाच्या शेवटी २ किंवा ३ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ४ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
  3. खाते क्रमांकाच्या शेवटी ४ किंवा ५ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ७ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
  4. खाते क्रमांकाच्या शेवटी ६ किंवा ७ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ८ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
  5. खाते क्रमांकाच्या शेवटी ८ किंवा ९ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.

 

News English Summary: A deposit of Rs 500 has been started in the account of women beneficiaries of Jan Dhan Yojana from April 3. The bank is notifying its account holders through SMS. “We are concerned about you,” Bank of Baroda said in an SMS message to its public account holders. Under Prime Minister Garib Kalyan Package Scheme, beneficiaries of PMJDY will be depositing Rs 500 per month for 3 months in the account of women. You will be informed of the withdrawal date and time. You are requested to contact the bank branch or bank friends as per the date and time given to you. Stay alert, stay healthy – thanks.

News English Title: Story 500 rupees deposited by Modi government in account of women beneficiaries of Jandhan Yojana know rule to withdraw Corona virus Covid 19 Lock Down News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x