धक्कादायक! चीनमध्ये ६ आठवड्यांनंतर मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण सापडले
बीजिंग, १४ एप्रिल: चीनमध्ये सहा आठवड्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्यामध्ये विदेशातून चीनमध्ये परतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. या नागरिकांकडून होणाऱ्या संसर्गामुळे आता चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले. याआधी सहा आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी चीनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे १४३ नवे रुग्ण आढळले होते. या देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता ८२ हजारांवर पोहोचली असून ३,३४१ जण मरण पावले आहेत.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी सांगितले की, रविवारी कोरोनाच्या आढळलेल्या १०८ नव्या रुग्णांपैकी ९८ जण विदेशवारीहून चीनमध्ये परतले आहेत. या देशात कोरोना साथीच्या रुग्णांच्या संख्येत फेब्रुवारीमध्ये घट झाली होती. मात्र, या साथीचा जागतिक स्तरावर फैलाव झाल्यानंतर चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत मार्चमध्ये पुन्हा वाढ दिसून आली. आता या साथीची दुसरी फेरी चीनमध्ये सुरू आहे.
पण दुसरीकडे चीनसारखा देश जगभरात पसरलेल्या आर्थिक मंदीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी चीननं दक्षिण चीन महासागरात युद्ध सराव केला होता. त्यानंतर आता चीननं आपला मोर्चा कच्च्या तेलाकडे वळवला आहे. चीनच्या कच्च्या तेलाच्या आयातीत तब्बल १२ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस एडनम यांनी सांगितले की, कोविड-१९ वेगाने फैलावत असून हा संसर्ग २००९ मध्ये आलेल्या स्वाइल फ्लूपेक्षा ही अधिक खतरनाक असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात करोनाच्या संसर्गाच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनसह इतर निर्बंधही टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
News English Summary: Six weeks later, a large number of new coronas have been reported in China. It has the highest number of foreigners returning to China. Infection by these citizens has now increased the number of coronary patients in China. 108 new coronary patients were found in China on Sunday. Six weeks ago, on March 5, 143 new coronary cases were reported in China in the same day. The total number of coroners in this country has now reached 82 thousand and 3341 people have died.
News English Title: Story after 6 weeks large number of new Covid 19 patients were found in China News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील