18 November 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

जिओमध्ये १% हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकची ५,६५६ कोटीची गुंतवणूक

Facebook, Silver lake, Jio Plarform

मुंबई, ४ मे: फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली होती. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला होता.

या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा होणार आहे. जिओ अँप प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होईल. या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहेत, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या जारी केलेल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं होतं.

आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने अजून एका कराराची घोषणा केली आहे. हा करार जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक यांच्यात झाला आहे. ५,५६५ कोटी रुपयांची गुंतवणूक सिल्वर लेक कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून आज याबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ एक टक्के हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकने जिओमध्ये तब्बल ५,६५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू ४.९० लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू ५.१५ लाख कोटी झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

सिल्वर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत ग्लोबल लीडर आहे. यापूर्वी सिल्वर लेकने अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल, अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.

 

News English Summary: Silver Lake will invest Rs 5,656 crore in Jio Platforms. This was announced today by Reliance Industries and Jio Platforms. Notably, Silver Lake has invested Rs 5,656 crore in Jio for just one per cent stake.

News English Title:  Story after Facebook another American company Silver Lake Invests rupees 5656 Crore In Jio Platforms Sas News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x