महाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
पुणे, २६ एप्रिल : कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत आलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि केंद्राकडून हवी असलेली मदत याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सविस्तर पत्र लिहलं आहे. आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.
पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या निवदेनात श्री. पवार यांनी म्हटले आहे, की गोरगरिबांसह आर्थिक संस्था, व्यवसाय आणि इतरांना केंद्र सरकारने पॅकेज दिले आहे. त्याचप्रमाणे राज्यांनाही केंद्राने आर्थिक पॅकेज दिले पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात राज्यांचीमोलाची कामगिरी असणार आहे, याकडे लक्ष वेधून शरद पवार यांनी `आता राज्यांना मदत न केल्यास ही कामगिरी करण्याच्या स्थितीत राज्य नसतील’ याकडेही लक्ष वेधले आहे.
केंद्राने महाराष्ट्राला आर्थिक मदत करायला हवी, यावर भर देताना पवार यांनी नमूद केले आहे, की २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी एक लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्राने मंजूर करावी. अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आदी सर्वच देशांनी सकल राष्ट्रीय उत्पान्नाच्या (जीडीपी) १० टक्के आर्थिक पॅकेज जाहीर केलेले आहे. त्यामुळे भारत सरकारसह रिझर्व्ह बॅंकेने राज्यांना योग्य आर्थिक पॅकेज देण्यासाठी विचार करण्याची गरज आहे.
राज्याचा सध्याचा आर्थिक आढावा मांडताना पवार यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्राच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ३४७००० कोटी रुपयांचा महसूल दाखवण्यात आला आहे. आता लगेचच अर्थव्यवस्थेला गती मिळू शकत नाही. काही काळानंतर ही गती मिळू शकेल. त्यामुळे १४०००० कोटी रुपयांचा महसूल कमी होणे अपेक्षित आहे. ही रक्कम एकूण महसूलच्या ४० टक्के असून त्यामुळे मोठा आर्थिक खड्डा पडणार आहे. राज्याला अपेक्षित खर्चासाठी एक लाख कोटी रुपयांचा तुटवडा जाणवणार आहे. राज्याने खर्चासाठी एफआरबीएम बॉरोविंग लिमिट वाढवून रक्कम घेतल्यास राज्य कर्जाच्या खाईत जाण्याची शक्यता आहे.
काय आहेत सविस्तर मागण्या;
Conveyed my concern to Hon. @PMOIndia and @nsitharamanoffc and drew their attention towards the following economic indicators and strategy to overcome the crisis faced by the State. pic.twitter.com/DfOxXEBMOy
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 26, 2020
News English Summary: NCP president Sharad Pawar has demanded that the Center provide a package of Rs 1 lakh crore to Maharashtra, which is facing severe financial difficulties due to corona and lockdown. In this regard, Sharad Pawar has written a detailed letter to Prime Minister Narendra Modi regarding the deteriorating economic situation of the state and the need for help from the Center. In his letter, Sharad Pawar initially gave an account of the deteriorating economic condition of the country.
News English Title: Story announce one lakh crore package for Maharashtra NCP Presindet Sharad Pawar writes letter to PM Narendra Modi News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS