चिंताजनक! ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल - IMF

वॉशिंग्टन, १६ एप्रिल: चीनमध्ये उत्पन्न झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लाॅकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे. मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आशियाला करोनाचा मोठा दणका बसणार आहे. ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) गुरुवारी व्यक्त केली आहे.
Economic growth in #Asia is expected to stall at 0% in 2020—the worst growth performance in almost 60 years. https://t.co/Nr3tD5nnGb #IMFBlog #IMFmeetings pic.twitter.com/pfO1oQrHUp
— IMF (@IMFNews) April 16, 2020
कोरोनामुळे आशियाचा विकासदर कदाचित शून्यावर देखील जाईल. मागील ६० वर्षांत पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती ओढावेल, असे री यांनी सांगितले. मात्र इतर खंडांच्या तुलनेत आशियाची कामगिरी बरी राहील. ते म्हणाले की, जागतिक मंदीच्या वेळी व्यक्त केलेला ४.७ टक्के विकासदराच्या अंदाजापेक्षाही प्रत्यक्षात नीचांकी होता. १९९० मध्ये आशियातील आर्थिक संकटावेळी विकासदर १.३ टक्के होता, असे आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अनेक देशांनी मदतीची मागणी केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी दिली. आयएमएफच्या १८९ सदस्य देशांपैकी १०२ देशांनी आतापर्यंत मदत मागितली असल्याचे त्या म्हणाल्या. या देशांना मदतीसाठी आयएमएफ १००० अब्ज डॉलर कर्जाचे वितरण करणार असल्याचे त्यांनी जागतिक बँकेबरोबरील बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
दुसऱ्या बाजूला ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी Barclays यांच्या अहवालाप्रमाणे लॉकडाऊन वाढवल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला १७.५८ लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये जीडीपीची वाढ देखील खुंटणार आहे. यावर्षी आर्थिक वृत्तीची गती शून्य राहील अशी शंका या कंपनीने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिडीपी वृद्धीची गती ०.८ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
News English Summary: The corona virus originating in China has engulfed the entire world. Lockdown is the only way to prevent this virus. However, the economy has been hit hard. Asia will be facing a big blow to Corona. For the first time in 60 years, Asia’s growth rate will drop to zero, the International Monetary Fund (IMF) said on Thursday.
News English Summary: Story Asian economy deep up to zero percent due to corona says IMF Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल