15 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

वर्ष २०२०'मध्ये भारताच्या GDP वृद्धीची गती शून्य राहण्याचा अंदाज - Barclays अहवाल

Barclays report, Indian GDP, Covid19, Corona Crisis

वॉशिंग्टन, १६ एप्रिल: चीनमध्ये उत्पन्न झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लाॅकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे. मात्र त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आशियाला करोनाचा मोठा दणका बसणार आहे. ६० वर्षात पहिल्यांदाच आशियाचा विकासदर शून्यावर जाईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF)गुरुवारी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे आशियाचा विकासदर कदाचित शून्यावर देखील जाईल. मागील ६० वर्षांत पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थिती ओढावेल, असे री यांनी सांगितले. मात्र इतर खंडांच्या तुलनेत आशियाची कामगिरी बरी राहील. ते म्हणाले की, जागतिक मंदीच्या वेळी व्यक्त केलेला ४.७ टक्के विकासदराच्या अंदाजापेक्षाही प्रत्यक्षात नीचांकी होता. १९९० मध्ये आशियातील आर्थिक संकटावेळी विकासदर १.३ टक्के होता, असे आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी Barclays यांच्या अहवालाप्रमाणे लॉकडाऊन वाढवल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला १७.५८ लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कॅलेंडर वर्ष २०२० मध्ये जीडीपीची वाढ देखील खुंटणार आहे. यावर्षी आर्थिक वृद्धीची गती शून्य राहील अशी शंका या कंपनीने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिडीपी वृद्धीची गती ०.८ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Barclays या कंपनीने आपल्या आधीच्या अंदाजात सांगितले होते की, ३ आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे १२० अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. त्यांचे म्हणणे असे आहे की, आता लॉकडाऊन वाढवल्यामुळे हा आकडा २३४.४ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. या कंपनीने आधीच्या अंदाजात सांगितले होते की, २०२०’मध्ये भारतात जीडीपी वृद्धीची गती २.४ टक्के असेल, मात्र आता त्यांनी ही गती शून्य राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे असले तरीही या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

 

News English Summary: According to a report by British brokerage firm Barclays, raising the lockdown will cost India’s economy 17.58 lakh crore. GDP growth is expected to decline in the calendar year 2020 as well. The company suspects that the pace of economic growth will be zero this year. It is projected that GDP growth will remain at 0.8 percent in FY 2020-21. The second phase of lockdown has been extended to May 3 to prevent corona virus infection.

News English Title: Story Barclays report cuts GDP forecast for India to zero for 2020 due to extended lockdown till May 3rd Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x