12 January 2025 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

चीनला मोठा आर्थिक धक्का, १००० विदेशी कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत

Covid 19, Corona crisis, China

नवी दिल्ली, २१ एप्रिल: चीनमधून आलेला कोरोना विषाणू संपूर्ण जगात धुमाकूळ माजवत आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनाबरोबरच अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. चीन हे जगातील सर्वांच्या पसंतीचे मॅन्यूफॅक्चरिंग हब आहे. परंतु, त्यांचा हा किताब लवकरच हिसकावला जाण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे १००० विदेशी कंपन्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी भारतात कारखाना सुरु करण्याबाबत चर्चा सुरु केली आहे.

भारतात आपले कारखाने उभे करण्यासाठी या कंपन्यांनी सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. बिजनेस टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, कमीत कमी ३०० मोबाईल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, टेक्सटाईल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स क्षेत्रातील कंपन्या भारतात कारखाने उभारण्यासाठी सरकारशी सक्रीय स्वरुपात संपर्कात आहेत. या कंपन्यांशी चर्चा यशस्वी झाली. तर चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे चीनमधील मृतांची संख्या अमेरिकेपेक्षाही जास्तच आहे. कोविड १९ साथीत त्यांच्याकडे खूप बळी गेले आहेत पण ते खरा आकडा सांगत नाहीत, असा आरोप करून ट्रम्प म्हणाले की, कोविड १९ म्हणजे करोना मृतांच्या संख्येत अमेरिका नव्हे तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. जर ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, इटली या प्रगत देशात मृतांचा दर जास्त असेल तर तो चीनमध्ये कमी असणे शक्यच नाही असं म्हटलं आहे. मात्र जगभरातील देश सध्या चीनपासून दोन हात लांब राहण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.

कोरोनोत्तर काळात चीनमधून अनेक विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे. जपान सरकारने तर घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि चीनमधून बाहेर पडण्यास सांगितलं आहे. जपानमध्ये परत या नाही, तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पाहा, असा सल्लाही जपाननं दिला आहे. आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

News English Summary: The corona virus from China is spreading all over the world. This has a direct impact on people’s lives as well as the economy. China is the world’s favorite manufacturing hub. However, his book is likely to be snatched soon. About 1000 foreign companies have started discussions with government officials about setting up a factory in India due to the problems created by the virus.

News English Title: Story big shock to China 1000 foreign companies are ready to come to India economist Arvind Panagariya said it is better opportunity for india News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x