17 January 2025 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: APOLLO Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
x

टाटा स्टील पगार व कामगार कपात करणार नाही; पण इंडियाबुल्स'कडून पगार कपात

TATA Steel, IndiaBulls Housing, Corona Crisis, Covid19

नवी दिल्ली, १३ एप्रिल: कोरोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. कोरोनाचा शॉक भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल आणि विकास दर २.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. याचा फटका अनेक उद्योगांना बसणार आहे. काही उद्योगांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात करण्याचे संकेत मिळत आहेत.

कारण आता इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने वेतनात सरासरी ३५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात ही वजावट होईल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. परंतु ही कपात कोरोनामुळेच झालेली असल्याचं कोणतीही सबब दिलेली नाही. कंपनीचा खर्च नियंत्रित करण्यासाठी ही कपात करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. कंपनीचे अध्यक्ष समीर गहलोत हेसुद्धा स्वतः पूर्ण पगार घेणार नाहीत, तर कंपनीचे उपाध्यक्ष, एमडी आणि सीईओ गगन बंगा यांच्या पगारामध्ये ७५% कपात करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे टाटा स्टीलने एक वर्ष कर्मचारी कपात किंवा पगार कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टाटा समूहाच्या मालिकीची असलेली टाटा स्टीलचे ग्लोबल सीईए टीव्ही नरेंद्रन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कर्मचारी आणि पगार कपात करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. कंपनीचे लक्ष्य फक्त सध्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उत्पादकता वाढवण्याची आणि त्याच विकास करण्याची आहे. परिस्थिती जशी सुधारेल तशी एक दिर्घकलीन योजना तयार केली जाणार असल्याचे नरेंद्रन यांनी सांगितले.

 

News English Summary: Tata Steel has announced that it will not cut employee deductions or salary cuts for one year. The announcement of the company has brought a great deal of relief to the employees. In an interview to an English newspaper, TV Narendran, a global CEO of Tata Steel, which owns a Tata group, said in clear terms that employees and salaries would not be deducted. The company’s mission is to increase and enhance the productivity of current employees and executives. As long as the situation improves, a long-term plan will be created, Narendran said.

News English Title: Story Corona crisis TATA steel CEO TV Narendran says their is no employees or cut in salary but IndianBulls Housing company will cut salary Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x