लॉकडाउनमुळे अनेक क्षेत्रांवर प्रभाव पडल्याने करोडो लोकांच्या नोकऱ्या जाणार - MSME रिपोर्ट
नवी दिल्ली, २९ एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक उद्योगधंदे बंद आहेत. कोरोनामुळे जीडीपीमध्ये मोठा वाटा असणार्या खाजगी, गुंतवणूक आणि परदेशी व्यापाराला चांगला फटका बसला आहे. यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कहर हा उद्योगधंद्यांवर देखील भारी पडणार आहे.
कोरोनाचा विमान वाहतुकीचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगातील बर्याच देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाउन आहे. भारताची उड्डाणे देखील पूर्णपणे बंद आहेत. या क्षेत्रात वेतन कपात व कॉस्ट कटींग सुरू झाली आहे. भारतातच या क्षेत्रातील हजारो नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. जर लॉकडाऊन आणखी वाढला तर अनेक विमान कंपन्यांच्या शटडाउन व्हायला उशीर लागणार नाही. जागतिक व्यापार सल्लागार कंपनी केपीएमजीच्या म्हणण्यानुसार, एविएशनसाठी हे २००८-०९ च्या मंदीपेक्षा मोठे संकट आहे.
दुसरीकडे लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील बेकारीचा दर २६.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. लॉकडाऊनमुळे देशातीलसुमारे १४ कोटी लोक बेकार झाले आहेत असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयइ) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले. ते म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यात ४० टक्के असलेले देशातील रोजगाराचे प्रमाण आता २६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. देशामध्ये सुमारे १ अब्ज लोक विविध प्रकारची कामे करून आपली रोजीरोटी कमावत असतात.
कोरोनाचा कहर हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या क्षेत्रावर ही पडू शकतो. उड्डाणे, वाहतूक आणि प्रवास पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सही बंद आहेत. लॉकडाउन उघडल्यानंतर लोकल वाहतूक सुरु झाली तर थोडासा व्यवसाय होऊ शकतो, परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्यास कित्येक महिने लागू शकतात. अगदी स्थानिक पातळीवर देखील, लोकं पुढील काही महिने रेस्टॉरंट्स किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळतील. अशा परिस्थितीत या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
देशातील एकुण रोजगारांमध्ये १४ टक्के घट झाली. याचा अर्थ १४ कोटी लोक लॉकडाऊनमुळे बेकार झाले आहेत. या विषयावर महेश व्यास यांनी सीएमआयइच्या वेबसाइटवर एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे देशातील ग्रामीण व शहरी भागामध्ये बेकारी वाढली आहे. देशातील बेकारीचे प्रमाण ग्रामीण भागात २६.७ टक्के तर शहरी भागात २५.१ टक्के आहे. मार्च महिन्याची अखेर व एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत बेकारीचे प्रमाण २३ ते २४ टक्के इतके होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते २३.८ टक्के इतके झाले तर दुसºया आठवड्यात ते २३.४ टक्क्यांपर्यंत खाली घसरले. पण एप्रिलच्या तिसºया आठवड्यात बेकारीचे प्रमाण पुन्हा २४ टक्क्यांवर गेले.
News English Summary: Many businesses are closed due to the increasing prevalence of corona. The corona has hit private, investment and foreign trade, a major contributor to GDP. It is expected to provide employment to millions of people. Corona’s havoc will also hit businesses.
News English Title: Story corona lockdown is likely to lose millions of jobs in India News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या