5 November 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

जगाची अर्थव्यवस्था ढासळणार पण चीनची ३.३ टक्क्यांनी वाढणार; मूडीजचा अंदाज

Corona Crisis, Corona Virus, China Moodys Report

लंडन, २६ मार्च:  कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरु नये म्हणून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनचा आता देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण होण्याचा अंदाज बार्कलेजने आपल्या अहवालात नोंदवला आहे. तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे २०२० च्या कॅलेंडर वर्षात भारताचा जीडीपी विकासदर २.५ टक्क्यांपर्यंत घसरु शकतो असे म्हटले आहे. सुरुवातीला भारताने २०२० मध्ये ४.५ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.

ब्रिटनमधील आर्थिक कंपनी बार्कलेजने आपल्या अहवालात लॉकडाऊनचा कालावधी आणखी एक आठवडा वाढवला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. लॉकडाऊन चार आठवड्याचा असेल. त्यानंतर ८ आठवडे आंशिक लॉकडाऊनही लागू होईल. यामुळे अर्थव्यवस्थेचे १२० अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. तीन आठवड्याच्या लॉकडाऊननेच ९० अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान जीडीपीच्या ४ टक्के आहे.

अशा पद्धतीने जीडीपीचा दर २ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे बार्कलेने भारताचा विकास दराचा अंदाज ४.५ टक्क्यांनी घटवून २.५ टक्के केला आहे. जर असे झाले तर १९९२ च्या आर्थिक सुधारणांनंतरचा हा सर्वांत कमी विकासदर असेल.

कोरोनामुळे जगभरात २१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून कोरोना पसरल्यामुळे जवळपास २०० कोटी लोकांना घरामध्येच कोंडून घ्यावे लागले आहे. म्हणजेच जगातील २० टक्के लोकसंख्या घरातच राहत आहे. जवळपास दोन डझन देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे.

दुसरीकडे मूडीजने वर्तविलेल्या अंदाजानुसार जी-२० देशांचा मिळून सकल घरगुती उत्पादन दर म्हणजेच जीडीपी२०२० मध्ये ०.५ टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे अमेरिकी अर्थव्य़वस्थेला दोन टक्के आणि युरो वापरणाऱ्या देशांना २.२ टक्क्यांचा फटका बसणार आहे. मात्र, याचबरोबर चीन हा कोरोना व्हायरसचे मुख्य केंद्र असले तरीही अर्थव्यवस्था ३.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

जी -२० अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, यूरोपीय संघ, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम आणि संयुक्त राज्या अमेरिकेचा समावेश आहे. या समूहातील देशांचा जगाच्या जीडीपीच्या ८५ टक्के वाटा आहे. याचबरोबर जागतिक व्यापारामध्येही या देशांचा वाट ८० टक्के आहे. जगातील दोन तृतियांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते.

 

News English Summery:  According to the estimates made by Moody’s, the gross domestic product rate of G20 countries, ie GDP, will decline by 0.5 percent in 2020. This would hurt the US economy by two percent and the euro countries by 2.2 percent. However, even with China being the main hub of the Corona virus, the economy is likely to grow by 3.3 percent. The G20 includes Argentina, Australia, Brazil, Canada, China, European Union, France, Germany, India, Indonesia, Italy, Japan, Mexico, Russia, Saudi Arabia, South Africa, South Korea, Turkey, United Kingdom and United States of America. Is. Countries in this group account for 85 percent of the world’s GDP. At the same time, the share of these countries is 80 percent in global trade. Two-thirds of the world’s population lives in these countries.

 

News English Title: Story corona virus America India recession period China gets good news Moodys report News latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x