बहुसंख्य कंपन्या कर्मचाऱ्यांचे वेतन, बोनस कापण्याच्या तयारीत, केंद्राकडे या मागण्या

नवी दिल्ली, 9 मे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होत असतानाच बहुसंख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस कापण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर काम केल्यानंतर प्रत्येक नोकरदारवर्ग मे महिन्याच्या अखेरीपासून पगारवाढ आणि बोनसची वाट पाहत असतो. आपल्या कामाचं कौतुक हे या पगारवाढ आणि बोनसमधून कर्मचाऱ्यांना कंपनी देत असते. पण आता सगळ्या कंपन्यांची याकडे करडी नजर आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कंपन्या पगारवाढ आणि बोनस कापण्याच्या तयारीत आहेत.
काही कंपन्यांचा असा विचार आहे की, पुढील दोन-तीन वर्षांकरता असा नियम बनवला जावा ज्यामध्ये पगारवाढ आणि बोनस दिला जाणार नाही. कंपनी आपल्यापद्धतीने नियम बनवण्याच्या तयारीत आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपन्यांनी केंद्र सरकारला असं सुचवलं आहे. कंपन्यांची ही गोष्ट जर केंद्र सरकारने मान्य केली तर हा नियम लवकरच लागू होऊ शकतो. पगारवाढ आणि बोनस न देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना काम करण्याचा कालावधी १२ तासांचा करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांसोबत होणाऱ्या वादात डिस्प्यूट ऍक्टमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात यावी. तसेच कारखाना चालवण्यासाठी ५०% कर्मचाऱ्यांना अनुमती द्यावी. लॉकडाऊन संपल्यानंतर एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी द्यावी. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत पीएफच्या योजनेचा फायदा कंपन्यांना सर्वाधिक दिला जावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे. या योजनेत सरकार कर्मचारी आणि कपंन्यांच हिस्सा जमा करते. कंपनी चालवण्यासाठी सरकारने मदत करावी. तसेच विजेच्या पुरवठ्याकरता सब्सिडी देण्यात यावी.
दुसरीकडे अशा प्रतिकूल परिस्थितीतही एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वेतनात आणि बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ गेल्या वर्षभरातील (मार्चपासून एप्रिलपर्यंत) असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस वाढविणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस, सॅमसंग, व्हर्लपूल आणि एलजीसह अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ज्या वेळी सर्व कंपन्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नुकसान झेलत असतानाच या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली असून, अनेक कंपन्यांनी काही प्रमाणात कर्मचारीही कमी केले आहेत.
दरम्यान, अनेकांच्या मनात यंदा पगारवाढ होणार की नाही?, हा प्रश्न अजूनही घुटमळत आहे. कंपन्यांनी यासंदर्भात काय धोरणं ठरवलं आहे, याविषयी ‘केजीपीएम’नं पाहणी केली. पगारवाढ विषयक असलेल्या पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. केजीपीएमनं केलेल्या ‘कटिंग थ्रू क्राइसिस’ या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
News English Summary: The majority of companies have decided to cut employees’ salaries and bonuses at a time when the growing prevalence of corona is affecting the country’s economy. After working for a year, every working class is waiting for salary increase and bonus from the end of May. Appreciation for your work is what the company pays employees through these pay rises and bonuses.
News English Title: Story corona virus corporate companies demand exemption from central government for not giving annual bonus and minimum salary to employees News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL