23 February 2025 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोरोना आपत्ती: देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, CII सर्वेक्षण

Corona Crisis, Covid19, CII, Job Loss

नवी दिल्ली, ७ एप्रिल: कोरोना व्हायरस जागातील १७५हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे ५,२९,६१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर १२१४५४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाने जगातील मृतांचा आकडा २३७१४ पर्यंत गेला आहे. भारतात हा आकडा ४,४२१वर गेला आहे. तर १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. यामुळे बाजारांना उभारी देण्यासाठी २५०० अब्ज डॉलरची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. हा आकडा कमी आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांनी IMF’कडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे.

“कोरोना व्हायरस नावाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे आणि विकसनशील देशांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे”, असे जॉर्जीव्हा म्हणाल्या होत्या. “जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने अनेक कंपन्या दिवाळखोर होण्याची आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचीही लाट येईल ही प्रमुख चिंता आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांना जवळपास २.५ ट्रिलियन डॉलरची गरज आहे.

मात्र आता भारतासाठी चिंता वाढवणारा सर्वे समोर आला आहे. सीआयआयनं केलेल्या एका सर्व्हेक्षणात यामुळे देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. तब्बल २०० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यादरम्यान ऑनालाइन पद्धतीनं सीआयआयनं सर्व्हेक्,ण केलं. ‘CII सीईओ स्नॅप पोल’नुसार देशातील सर्वाधिक कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं समोर आलं आहे. तसंच यामुळेच नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुरू तिमाहित आणि गेल्या तिमाहित बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नात १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशांतर्गत कंपन्यांचं उत्पन्न आणि नफा या दोन्हीमध्ये होत असलेल्या घसणीचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही पडणार असल्याचं सीआयआयकडून सांगण्यात आलं. रोजगाराकडे पाहिल्यास संबंधित क्षेत्रांमध्ये ५२ टक्के नोकऱ्यांवर गडांतर येऊ शकतं असं सर्व्हेक्षणादरम्यान निरीक्षण समोर आलं आहे.

 

News English Summary: But now, a worrying survey has emerged for India. In a survey conducted by the CIA, it estimates that 52 percent of jobs in the country could be paid. The CIA conducted an online survey during the CEOs of over 200 companies. According to the ‘CII CEO Snap Poll’, most of the country’s companies have seen a drop in income. And that’s why jobs are being predicted. Observations during the survey have shown that employment can account for 52 percent of jobs in the respective sectors.

 

News English Title: Story Corona virus lock down big impact in India 52 percent jobs may cut Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x