5 November 2024 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

भारतात लॉकडाऊन वाढत राहिल्यास भयानक आर्थिक परिणाम होतील: जागतिक बँक

Covid19, Corona Crisis, Corona Virus, World bank

वॉशिंग्टन डीसी, १२ एप्रिल: जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. या अहवालात २०१९-२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल.

कोरोना व्हायरसचा झटका अशा वेळी बसला आहे. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था आधीच घसरणीला लागली होती. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि धोका वाढल्याने देशांतर्गत गुंतवणुकीत सुधारणा करावी लागले. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार पुढील आर्थिक वर्ष म्हणजे २०२१-२२ मध्ये करोनाचा प्रभाव संपेल आणि त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ५ टक्के विकास दर गाठू शकेल.

भारतातील लॉकडाऊन आणखी वाढला तर ते अर्थव्यवस्थेसाठी निश्चित चांगले असणार नाही. या लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम अधिक भयानक असतील. या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताला सर्वात प्रथम करोनाचा प्रसार होण्यापासून रोखले पाहिजे. त्याच बरोबर सर्वांना अन्न-धान्य मिळेल याची सोय करावी, असे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ हॅस टीमर यांनी सांगितले.

दरम्यान, जगभरातील देशांना कोरोना विषाणूने घेरले आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. २०२० मध्ये जागतिक विकास वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण करेल, असेही नमूद केलं होतं.

त्या पुढे म्हणाल्या की, २०२० मध्ये जागतिक विकास नकारात्मक होईल, हे आधीच स्पष्ट आहे. वास्तविक आपल्याला या मोठ्या मंदीनंतर सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागू शकतो. ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोना विषाणूमुळे जगातील अर्थव्यवस्थेत १९३० च्या महामंदीनंतरची सर्वांत मोठी घसरण दिसू शकते. जग या संकटाच्या कालावधीवरुन अनिश्चित आहे. पण हे आधीच स्पष्ट झाले आहे की, २०२० मध्ये जागतिक वृद्धी दरांत मोठी घसरण होणार आहे.

 

News English Summary: The World Bank on Sunday submitted the latest report on the economy in South Asia. According to the report, the growth rate of the Indian economy will be 5 percent in 2019-20. So in 2020-21, the growth rate will decrease to 2.8 per cent. The Corona virus is at its peak. When the Indian economy was already declining. Domestic investment has to improve due to uncertainty and risk to the global economy. According to the World Bank report, the impact of the Corona emergency will end in the next financial year, 2021-22, and then India’s economy will reach 5% growth rate.

News English Title: Story Corona Virus setback for Indian economy says world bank Covid19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x