22 November 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चिंता मिटली! लॉकडाऊनमुळे हफ्ता चुकला तरी CIBIL वर परिणाम होणार नाही

CIBIL Score, RBI, EMI Bounce, Lock Down, Corona Crisis

मुंबई, ३० मार्च: करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सरसकट कर्जदाराला ही सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरबीआयने केवळ बँकांना स्थगिती देण्याची परवानगी दिली आहे. यासाठी प्रत्येक कर्जदारास बँकेला विनंती करावी लागेल आणि कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे त्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे, हे सांगावे लागेल. बँकेने कर्जदाराची विनंती मान्य केल्यानंतरच याचा त्याला फायदा मिळणार आहे. अन्यथा कर्जदाराच्या खात्यातून पैसे वजा केले जातील. कर्जदाराला अर्ज करुन सर्व माहिती दिल्यानंतर बँक त्याबाबत निर्णय घेऊ शकेल.

दरम्यान, कर्जाशी संबंधित सर्व माहिती जमविणाऱ्या ट्रान्सयुनियन सिबिलकडून सोमवारी महत्त्वाची माहिती देण्यात आली. लॉकडाऊननंतर रिझर्व्ह बँकेने कोणत्या सूचना केल्या आहेत. त्या सर्वांचा अभ्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

ट्रान्सयुनियन सिबिलने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ग्राहकांचे हफ्ते तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आम्ही सर्व बँकांनी कोणाकोणाला कर्ज दिले, त्याची माहिती गोळा करीत आहोत. ही माहिती जमविल्यावर आम्ही कोणत्याही ग्राहकाचा जर हफ्ता पुढील तीन महिन्यांत चुकला तर त्याच्या सिबिल रेकॉर्डवर कोणताही परिणाम न होण्यासाठी व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करीत आहोत.

 

News English Summary: Important information was provided Monday by TransUnion CIBIL, which collects all debt-related information. What are the suggestions made by the Reserve Bank after the lock down? All of them are said to be studying. The central government has implemented a 21-day lock down in the country to prevent the transmission of corona virus. The RBI has advised all banks to postpone customers for three months, said TransUnion CIBIL. After that, we are collecting information about whom all the banks have loaned. After collecting this information, we are making necessary changes to the system to ensure that no customer misses the next three months in the next three months.

 

News English Title: Story EMI bounce CIBIL score missing home personal other loans due date installment payment failure will not impact News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x