YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडी'कडून अटक

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक केली आहे. येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी दिवसभर कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत कपूर यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असून अधिक तपासासाठी मध्यरात्रीनंतर कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता कपूर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Mumbai: Enforcement Directorate (ED) arrests #YesBank founder #RanaKapoor. Visuals from ED office where he was being questioned. pic.twitter.com/K7GSr7gCl1
— ANI (@ANI) March 7, 2020
ईडीच्या बॅलॉर्ड पीअर येथील प्रादेशिक कार्यालयात कपूर यांची चौकशी करण्यात आली. यावेळी ६०० कोटी रूपयांच्या कर्जप्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होतं. राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या होत्या.
भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेने दिलेल्या 4,450 कोटी रुपयांसाठी कंपनीला पैसे दिले, ज्याची चौकशी सुरू होती. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येस बँकेनं डीएचएफएलला 3,750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटींचे कर्ज दिलं आहे.
शुक्रवारी बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले होते. ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.
News English Summery: Yes Bank Crisis There has been a huge uproar across the country after the government imposed financial sanctions. Enforcement Directorate (ED) arrested Yes Bank CEO Rana Kapoor on Sunday morning in the case of money laundering case of Dewan Housing Finance Corporation Limited (DHFL). ED officers have arrested them after nearly 20 hours of interrogation. Rana Kapoor is expected to appear in court around 11am on Sunday morning. Rana Kapoor was interrogated by ED on Saturday at Samudra Mahal residence in Vari. ED is investigating whether Yas Bank promoter Rana Kapoor and his two daughters’ dummy company Urban Bank Ventures received Rs 600 crore from the scams.
Web News Title: Story Enforcement Directorate arrests YES bank promoter Rana Kapoor in DHFL money laundering case.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल