21 November 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोना आपत्तीमुळे पर्यटन उद्योगाला तब्बल ५ लाख कोटींचा फटका

Corona Crisis, Tourism Industry, News Latest Updates

नवी दिल्ली, १८ मार्च:  कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम इतर क्षेत्रांवरही दिसत आहे. १० जानेवारीच्या प्रसार माध्यमातील आकडेवारीनुसार भारतीय टूर ऑपरेटर्सला यामुळे ५० कोटी डॉलर्सचा (३,५५० कोटी रुपये) फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर असेच चित्र कायम राहिले तर हे नुकसान तब्बल १४,२०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तो केवळ भारतीय टूर ऑपरेटर्ससंबंधित होता. दरम्यान, पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.

त्यावेळी कोरोनाच्या परिणामात चीनमध्ये कोरोनामुळे सुमारे ८०० जणांचा बळी गेले होते आणि ३४ हजारांपेक्षा जास्त लोक आजारी होते. त्यामुळे चीन व इतर देशांतून भारतात येणारे पर्यटक आपली तिकिटे रद्द करत करत होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारनेही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली होती. १५ जानेवारी २०२० नंतर चीनला भेट देणाऱ्या पर्यटकांना भारतात प्रवेश नाकारण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे उपाध्यक्ष ई.एम. नजीब माहिती देताना म्हणाले होते की, विदेशी पर्यटकांसोबतच भारतातील पर्यटकही दक्षिण भारतातील आपल्या सहलींचे बुकिंग रद्द करत आहेत. मात्र एकूण पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसायांचा विचार केल्यास त्यानंतरच्या एकूण आकडेवारीबद्दलची धक्कादायक माहिती संसदेत समोर आली आहे. कारण आज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने संसदेच्या स्थायी समितीला दिलेल्या माहितीनुसार, कोरोना आपत्तीमुळे एकूण पर्यटन क्षेत्राला तब्बल ५ लाख कोटींचा फटका बसल्याची माहिती दिली आहे.

 

News English Summery:  The outbreak of the Corona virus outbreak is also seen in other areas. According to media figures on January 10, Indian tour operators were expected to hit $ 50 million (Rs 3,550 crore). Accordingly, if the same picture remains in place throughout the year, the loss could go up to Rs 14,200 crore. The estimate was made in a Reuters news report on January 10. But it was only related to Indian tour operators. In the meantime, there are many small and large enterprises dealing with the tourism sector. As a result of the coronet, coronas had killed about 800 people in China and more than 34,000 people were sick. Due to this, tourists coming to India from China and other countries were canceling their tickets. Then, as a precautionary measure, the Indian government had also banned tourists coming from China. After January 15, 2020, tourists visiting China begin to deny entry to India. Then the Vice President of the Indian Association of Tour Operators, E.M. Najeeb said that in addition to foreign tourists, tourists from India are also canceling bookings of their trips in South India.

 

News English Title:  Story Indian Tourism industry has lost 5 lakhs crore rupees because of Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x