5 November 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

भारतातील मोठ्या स्टार्टअप्स'मध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक; पण उद्देश डेटा सायन्स?

China Investment, Indian Startups, Covid 19

वॉशिंग्टन, २० एप्रिल: टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. ‘ईटी’ला काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं असलेल्या १६ प्रकारच्या कंपन्यांना निर्मितीची परवानगी द्यावी, अशी शिफारस उद्योग विभागाने केली आहे. एका शिफ्टमध्ये काम सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर भर देण्यात येईल.

गुंतवणूकदार रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्टअपच्या स्थितीबाबत म्हटले की, या सर्व कंपन्या सध्या त्यांच्याकडे १८ ते २४ महिन्यांसाठी पर्याप्त रोकड आहे की नाही याची चाचपणी करत आहेत. पैसे गोळा करण्यासाठी हा वाईट काळ आहे. कारण आता जर ते पैसे जमवण्याचा प्रयत्न करु लागले तर त्यांना अत्यंत कमी किंमत मिळेल. अशात मला वाटते की, पुढील महिन्यात बे एरियातून तुम्हाला मोठ्या संख्येने बेरोजगारीच्या बातम्या वाचायला मिळतील.

याच बदलत्या आर्थिक घडामोडींचा फायदा घेऊन चिनी कंपन्या भारतात प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक करून भारताच्या आर्थिक नाड्या स्वतःकडे खेचण्याच्या तयारीत होता. जगभरात आर्थिक चणचण जाणवत असताना चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने काही दिवसांपूर्वी एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या गृहवित्त बँकेत म्हणजे एचडीएफसीत शेअर भाव कोसळताच आपले भागभांडवल वाढवले. त्यानंतर भारताने चीनच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीविरोधातही फास आवळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. संधिसाधू गुंतवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात रोकड तरलतेचा अभाव असल्याने आर्थिक संकट आहे. याचा फायदा घेऊन चीनने अनेक उद्योगांमध्ये आपले पाय पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीन मुळात गुंतवणूक करतो ती डेटा सायनच्या उद्देशाने जे उद्याचं भविष्य असणार आहे. तोच देश सर्वात श्रीमंत असेल ज्याच्याकडे सर्वाधिक डेटा उपलब्ध असेल आणि त्यामुळेच भारतीय स्टार्टअप्स त्यांचं प्रमुख लक्ष आहेत.

दरम्यान भारताच्या नव्या धोरणांचा सर्वाधिक फटका देशातील स्टार्टअप्सना बसणार आहे. या क्षेत्रातील चिनी गुंतवणूक जवळपास ३९० कोटी डॉलर इतकी आहे. फ्लिपकार्ट, पेटीएम, ओला, बैजूज्, झोमॅटो, बिग बास्केट या कंपन्यांमध्ये अलिबाबा आणि टेन्सेंट या चिनी कंपन्यांनी भरीव गुंतवणूक केलेली आहे. येथून पुढे ती सशर्त पद्धतीने होणार असेल, तर गुंतवणूकदार आणि लाभार्थी अशा दोघांसाठी ही निराळ्याच प्रकारची लाल फीतशाही ठरेल, ज्यातून कोणाचाच लाभ होणार नाही.

दरम्यान, कोरोनोत्तर काळात चीनमधून अनेक विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे. जपान सरकारने तर घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात दिला आणि चीनमधून बाहेर पडण्यास सांगितलं आहे. जपानमध्ये परत या नाही, तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पाहा, असा सल्लाही जपाननं दिला आहे. आता अमेरिकन कंपन्यांही आपले मॅन्युफॅक्चरिंगचे काम चीनमधून हलवतील आणि तशाच तुलनेनं स्वस्त मनुष्यबळ व कच्चा मालासह अन्य सेवांसाठी भारतात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. साधारण २०० कंपन्या भारतात आपले तळ उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात अधिक पारदर्शक कारभार असून, नवी दिल्लीने आर्थिक सुधारणांना वेग दिला आहे. भारतानं काही बदल स्वीकारले तर या कंपन्या भारतात येतील आणि त्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकेल.

 

News English Summary: Taking advantage of these changing economic developments, Chinese companies were poised to invest in India and pull India’s financial momentum. China’s People’s Bank of China increased its stake in HDFC, the country’s largest mortgage bank, by dropping its share price in HDFC, just a few days ago, as the global financial crisis felt. Since then, India has also lent its investors against China’s direct and indirect investments.

News English Title: Story Investment of Chinese companies in big Indian Startups for Data science News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x