स्टार्टअपमध्ये कर्मचारी आणि वेतन कपातीची तयारी सुरु - गुंतवणूकदार रंगास्वामी
वॉशिंग्टन, १४ एप्रिल: टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. ‘ईटी’ला काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. अर्थव्यवस्थेची चाकं असलेल्या १६ प्रकारच्या कंपन्यांना निर्मितीची परवानगी द्यावी, अशी शिफारस उद्योग विभागाने केली आहे. एका शिफ्टमध्ये काम सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यावर भर देण्यात येईल.
दुसरीकडे, भारतीय उद्योगपती आणि आयटी व्यावसायिकांचे केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीने कोरोना विषाणूच्या फैलावानंतर उद्भवलेल्या स्थितीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. यामध्ये कर्मचारी कपात, वेतनात कपात आणि नव्या कर्मचारी भरतीस स्थगितीचा समावेश आहे. आघाडीचे गुंतवणूकदार रंगास्वामी यांनी पीटीआय’सोबत बोलताना म्हटले की, अनेक स्टार्टअपमध्ये कर्मचाऱ्यांची कपात किंवा त्यांच्या वेतनात कपातीची तयारी सुरु झाली आहे.
रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्टअपच्या स्थितीबाबत म्हटले की, या सर्व कंपन्या सध्या त्यांच्याकडे १८ ते २४ महिन्यांसाठी पर्याप्त रोकड आहे की नाही याची चाचपणी करत आहेत. पैसे गोळा करण्यासाठी हा वाईट काळ आहे. कारण आता जर ते पैसे जमवण्याचा प्रयत्न करु लागले तर त्यांना अत्यंत कमी किंमत मिळेल. अशात मला वाटते की, पुढील महिन्यात बे एरियातून तुम्हाला मोठ्या संख्येने बेरोजगारीच्या बातम्या वाचायला मिळतील.
सिलिकॉन व्हॅली स्वतः स्टार्टअप्सला कपात करण्यासाठी प्रेरित करत आहे, असे रंगास्वामी यांनी म्हटले. ते म्हणाले की, असे नाही की यामुळे अर्धी सिलिकॉन व्हॅली बंद होईल. यामुळे पाच टक्के कर्मचारी संख्या प्रभावित होऊ शकते किंवा १० टक्के काम कमी केले जाऊ शकते. लोकांना वेतनात १० टक्के कपात सहन करावी लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे जेव्हा जेव्हा प्रमुख अर्थव्यवस्थेचे शेअर खाली पडत आहे. तेव्हा चीन आशिया खंडातील वित्तीय संस्थांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. चीनने काही वर्षांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. देशात कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कमजोर पडत असताना महत्त्वाच्या वित्तीय संस्थांमध्ये चीन गुंतवणूक करत आहे.
News English Summary: Silicon Valley, the hub of Indian businessmen and IT professionals, has begun preparations to deal with the outbreak of the Corona virus outbreak. These include staff reductions, wage reductions and the hiring of new employees. Leading investor Rangaswamy, speaking of PTI, said that big IT companies like Google and Facebook may have a different outlook. However, many startups have begun to cut staffing or pay cuts.
News English Title: Story layoffs in Silicon Valley salary cuts and preparations to stop Recruitment corona crisis hit on startup sector News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार