22 April 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विकून मोकळे व्हा....अन्यथा

Corona Crisis, Covid 19, Builders, Construction Lobby

मुंबई, २९ एप्रिल : केंद्र सरकारने टाळेबंदीत मर्यादित शिथिलकरणाचा निर्णय घेतल्याचा उद्योग, व्यावसायिकांना काहीच लाभ झालेला नाही. अनेक अटी आणि शर्तीमुळे व्यावसायिक बेजार झाले आहेत. ग्रामीण भागात टाळेबंदी शिथिल करण्यात आली. मात्र, उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याच्या परवानगीसाठी प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे उद्योग-व्यवसाय सुरू करणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

दुसऱ्याबाजूला कोरोनाच्या टाळेबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राट्रेक, एसीसी, माणिकगड, अंबुजा या प्रसिद्ध सिमेंट कंपन्यांच्या पाच प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. मात्र या पाचही कंपन्यांनी सिमेंटच्या एका बँग मागे ४० रूपये दरवाढ केल्याने बांधकाम व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. तसेच एसीसी व अंबुजा या दोन कंपन्यांनी ट्रक भाड्यात २० टक्के कपात केल्याने वाहतुक व्यवसायिकांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

बांधकाम व्यवसाय अडचणीत आला असतानाही घरांच्या किंमती कमी होत नाही. मुंबईत प्रति चौरस फूट ३० – ४० हजार रुपये भाव मिळेल या आशेवर अनेक विकासक आहेत. बँकांच्या कर्जांचे हप्ते भरत बसतील. पण भाव कमी करणार नाही. परंतु, ते दिवस आता सरले आहे. जास्त लोभ बाळगू नका. जो माल तयार आहे तो विकून मोकळे व्हा. प्रसंगी ना नफा ना तोटा या तत्वावर घरे विका. अन्यथा वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कान टोचले.

बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना असलेल्या नरेडकोने बुधवारी एक वेबिनार आयोजित केले होते. नरेडकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी आणि राजन बांदेलकर यांनी आपल्या विविध मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर बांधकाम व्यवसायावरील संकटाचा उहापोह करतानाच विकासकांनी आता पर्यायी व्यवसायांची कास धरायला हवी असा सल्ला गडकरी यांनी दिला.

 

News English Summary: Housing prices are not falling even as the construction business struggles. Bank loan installments will be paid. But prices will not go down. But, that day is now over. Don’t be too greedy. Feel free to sell the finished product. Sell homes on a no-profit no-loss basis. Union Minister Nitin Gadkari slammed the builders saying that otherwise they would have to face a bad situation.

News English Title: Story let go greed sell houses and be free Union Minister Nitin Gadkari advised builders News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या