21 April 2025 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

यूपीत १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री; दिल्लीत कोरोना फी लागू

Corona Crisis, Covid 19, Delhi State Govt, Corona Fees, liquor Sale

नवी दिल्ली, ५ मे: सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर अनेक राज्य सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. बंगळुरुमध्येही दुकानांबाहेर लागलेल्या रागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे मोठया प्रमाणावर उल्लंघन झाले. अनेकांनी स्वत:हासाठी दुसऱ्यांना रांगेत उभे केले होते. दारूची दुकाने सुरु होताच पहिल्याच दिवशी अनेक राज्यांना बऱ्यापैकी महसूल मिळाला आहे.

लॉकडाउनमुळे सध्या अर्थचक्र ठप्प आहे. त्यामुळे सगळयाच राज्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. उत्तर प्रदेशात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री झाली. उत्तर प्रदेशात लॉकडाउन नसताना दिवसाला सरासरी ७० ते ८० कोटीपर्यंत दारूची विक्री होते. राज्याची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये ६.३ कोटी दारूची विक्री झाली. स्टॉक संपल्यामुळे अनेकांना दुपारनंतर दुकाने बंद करावी लागली.

दरम्यान, दिल्ली सरकारने दारु विक्रीवर स्पेशल कोरोना फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. एमआरपीवर 70 टक्के फी आकरण्यात येणार आहे. वाढणारे दर मंगळवार सकाळपासून लागू करण्यात येणार आहेत. उत्पादन शुल्क आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, पोलिसांना दारुच्या दुकानांवर कायदा, सुव्यवस्था निर्माण करण्यास मदत करण्याबाबत सांगितलं आहे. दिल्लीत सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 पर्यंत दारुची दुकानं सुरु राहणार आहेत. मात्र, एका रिपोर्टनुसार, वाईन शॉप बाहेरील गर्दी टाळण्यासाठी दारु विक्रीची वेळ वाढवली जाऊ शकते. त्याशिवाय लोक गरजपेक्षा अधिक दारुची खरेदी करत करु शकतात त्यामुळे दुकानांमध्ये पुरेसा साठा असण्याबाबतही सांगण्यात आलं आहे.

सीएम केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानंतर दिल्ली रेड झोनमध्ये असताना आम्ही काही अटींसह दारूविक्रीला सूट दिली होती, परंतु काही ठिकाणी सामाजिक अंतर न पाळता त्याची थट्टा केली गेली आहे. ते आम्हाला कधीच मान्य होणार नाही. पुन्हा असा प्रकार आढळून आल्यास संबंधित भाग सील करू, असा इशाराच केजरीवालांनी दिला आहे. आर्थिक कामकाजादरम्यान दुकानदारांनाही आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. काही लोकांमुळे आपण संपूर्ण दिल्लीला धोक्यात घालू शकत नाही. सोमवारी दारूच्या दुकानांबाहेर झालेल्या गोंधळानंतर केजरीवालांनी हा इशारा दिला आहे.

 

News English Summary: The Delhi government has decided to impose a special corona fee on the sale of liquor. MRP will be charged at 70 per cent. The rising rates will be implemented from Tuesday morning. The Commissioner of Excise has written a letter to the Commissioner of Police asking him to help in maintaining law and order in liquor shops.

News English Title: Story liquor Delhi state government imposed 70 special corona fees on liquor sale News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या