15 January 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

येस बँक गैरव्यवहारप्रकरणी धीरज आणि कपिल वाधवान सीबीआयच्या ताब्यात: गृहमंत्री

Anil Deshmukh, CBI, Kapil and Dhiraj Wadhwan, YES Bank Scam

मुंबई, २६ एप्रिल : येस बँक गैरव्यवहारप्रकरणी वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. येस बँकेत कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी गैरव्यवहार केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांनी महाबळेश्वरला केलेल्या प्रकरामुळे देखील त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितले की, ‘सीबीआयच्या टीमने साताऱ्यात जात कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिसांच्या सहकार्याने वाधवान बंधूना सीबीआयने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी साताऱ्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. या प्रक्रियेत सातारा पोलिसांनी मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक असलेले सर्व नियम पाळले जात आहेत. एवढंच नव्हे तर १+३ असा प्रवास करणार असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे.’ तसंच, तर अमिताभ गुप्तांचा चौकशी अहवाल आज किंवा उद्या येणार असल्याचंही देशमुखांनी सांगितलं आहे.

दरम्यान, येस बँक प्रकरणात चौकशीसाठी हवे असलेले दिवाण हौसिंग फायनान्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान तसेच त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना विलगीकरणानंतर आपल्याला कळविल्याशिवाय सोडण्यात येऊ नये, असे पत्र केंद्रीय गुप्तचर विभागाने साताऱ्याचे जिल्हा न्यायाधीश तसेच पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. वाधवान यांचं विलगीकरण पूर्ण झाल्यानंतर आज सीबीआयच्या विशेष पथकानं त्यांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं. गृहमंत्री देशमुख यांनी याची माहिती दिली.

 

News English Summary: CBI has arrested Wadhwan brothers in Yes Bank fraud case. The process of arresting Kapil and Dheeraj Wadhwan has begun. Home Minister Anil Deshmukh has given this information. Yes Bank was misappropriated by Kapil Wadhwan and Dheeraj Wadhwan. He is being prosecuted in this case. He will also be prosecuted for what he did to Mahabaleshwar.

News English Title: Story Maharashtra home minister Anil Deshmukh says CBI team has taken both Kapil and Dhiraj Wadhwan into custody News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x