राज्य आर्थिक अडचणीत; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागण्याची शक्यता
मुंबई, १० एप्रिल: करोना विषाणूची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळं एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचं कर्ज काढावं लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
राज्य सरकारवरील कर्जाचा भार आधीच वाढता आहे. त्यातच लॉकडाऊनमुळं गेल्या काही दिवसांपासून सर्व उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. वस्तू व सेवा कर (GST), मुद्रांक शुल्क (Stamp Duty), अबकारी कर (Excise) व परिवहन करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळं राज्याला जवळपास ४० हजार कोटींचा महसुली तोटा झाला आहे.
दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. देशातले २० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण राज्यात आहेत. वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी वेतन दुप्पट करण्यात यावं, अशी मागणी ठाण्यातल्या ओवळा-माजिवाड्याचे आमदार आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
दरम्यान, राज्यात अन्य लोकप्रतिनिधींमध्ये महापालिकेचे नगरसेवक, नगरपालिकांचे अध्यक्ष, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, पंचायत समित्यांचे सभापती आणि सरपंच यांना मानधन दिले जाते. त्यातही ३० टक्के कपात वर्षभर केली जाणार आहे. विधिमंडळाच्या ज्या विविध समित्या असतात त्या समित्यांच्या सदस्य आमदारांना भत्ते मिळतात. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप या समित्या तयार झाल्या नसल्याने तूर्त तरी हे भत्ते आमदारांना मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
News English Summary: The shock of the Corona virus and the subsequent lockdown have hit the state government. As a result, sources say that the government may have to take out a loan of Rs 15-20,000 crore for the three months of April to June. The debt burden on the state government is already increasing. In the meantime, lockdown has stalled all industries, businesses and financial transactions over the past few days. Revenue from the Goods and Services Tax (GST), Stamp Duty, Excise Tax and Transport Tax has been completely closed. As a result, the state has lost about Rs 40,000 crore in revenue loss.
News English Title: Story Maharashtra lockdown government will have to borrow rupees 15 to 20 thousand crore to pay salaries Covid19 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC