17 January 2025 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
x

खराब आर्थिक स्थितीतही पगाराबाबत अनेक कंपन्यांकडून गुड न्यूज...नक्की वाचा

Corona Crisis, Lockdown, Company Budgets, Economy

नवी दिल्ली, ५ मे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम देशाच्या अर्थचक्रावर होत असतानाच बहुसंख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस कापण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी वेतनात आणि बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ गेल्या वर्षभरातील (मार्चपासून एप्रिलपर्यंत) असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बोनस वाढविणाऱ्या कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस, सॅमसंग, व्हर्लपूल आणि एलजीसह अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ज्या वेळी सर्व कंपन्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नुकसान झेलत असतानाच या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली असून, अनेक कंपन्यांनी काही प्रमाणात कर्मचारीही कमी केले आहेत.

दरम्यान, अनेकांच्या मनात यंदा पगारवाढ होणार की नाही?, हा प्रश्न अजूनही घुटमळत आहे. कंपन्यांनी यासंदर्भात काय धोरणं ठरवलं आहे, याविषयी ‘केजीपीएम’नं पाहणी केली. पगारवाढ विषयक असलेल्या पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. केजीपीएमनं केलेल्या ‘कटिंग थ्रू क्राइसिस’ या सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे लॉकडाउननंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे.

केजीपीएमनं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, जगातील ५० टक्के कंपन्यांनी वेतनवाढीसाठी तयार केलेल्या बजेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडं ३६ टक्के कंपन्यांनी त्यांच्या वेतनवाढीच्या बजेटमध्ये कपात केली आहे. भारतातील ७० टक्के कंपन्यांनी व्यवस्थापकीय विभागाशी संबंधित नसलेल्या आणि कनिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचं संकट कायम राहिल्यास भविष्यात २२ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते कमी करू शकतात. या निर्णयाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावरच होणार आहे.

 

News English Summary: The KGPM said in its report that 50 per cent of the world’s companies have not made any changes in their budgets for pay hikes. On the other hand, 36 per cent of companies have cut their wage budgets. About 70 per cent of companies in India have decided not to make any changes in the salaries of non-management and junior management employees.

News English Title: Story many firms across industries keeping salary hike budgets unchanged amid pandemic News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x