राज्य शासनाच्या 'या' निर्णयामुळे अॅक्सिस बँकेला मोठा आर्थिक फटका बसणार
मुंबई : राज्यात काही बँकांचे घोटाळे आणि बुडीत कर्जामुळे बँका देशोधडीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या येस बँकेच्या घटनेमुळे अनेक महानगर पालिकांचा पैसा देखील त्यात अडकल्याने प्रशासनाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. अनेकांचे पैसे अडकले. त्यामुळ नवा पेच निर्माण झाला आहे. लोकांचा पैसा सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यामुळे सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. १ एप्रिलपासून खासगी तसेच सहकारी बँकेतील खाती बंद करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे अॅक्सिस बँकेला मोठा फटका बसणार आहे. , पंजाब नॅशनल बँक, येस बँक यांच्या व्यवहारात अनियमितता आढळून आली आहे. तसेच बँकांना कर्जाच्या माध्यमातून गंडा घातला गेला आहे. कर्ज वसुली न झाल्याने आणि बँकेची व्यवहारात अनियमितता यामुळे रिर्झव्ह बँकेने निर्बंध लादले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला. त्याबाबत शासन अध्यादेश जारी केला आहे.
सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आदींनी त्यांच्याकडील सर्व बँकिंग विषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करण्यात यावेत. तसेच यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती १ एप्रिल, २०२०पासून बंद करावीत. आणि केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत, असे या शासन परिपत्रकात म्हटले आहे.
ऍक्सिस बँकेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे भाडे खाते हे देखील सरकारी बँकेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या खात्याची रक्कम ही जवळपास ११०० कोटींपर्यंत होती तर झोपडपट्टी पुनर्सवन प्राधिकरणाच्या भाडे खात्याची रक्कम ही ९०० कोटींपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज्य सरकार संबंधित अनेक खात्यांचे व्यवहार ऍक्सिस बँकेत असल्याने ऍक्सिस बँकेला मोठा आर्थिक फटका बसून त्यांचे देखील आर्थिक नियोजन बिघडणार यात वाद नाही.
News English Summery: Some bank scams are coming out in the state. Similarly, some banks in the state and country are leaving. Many people are stuck with money. This has created a new screw. The state government has taken steps to keep people’s money safe. Therefore, the state government has issued an order that public corporations should deposit money in the nationalized bank. From April 1, private and co-operative bank accounts will be closed. Axis Bank will be hit hard by the Maharashtra government’s decision. , Punjab National Bank, Yes Bank have been found to have irregularities in their dealings. Banks have also been mortgaged through loans. The RBI imposed restrictions on non-recovery of debt and irregularities in the bank’s dealings. This has caused a huge blow to the general public. Therefore, this decision was taken by the government leading the development so that there would be no danger in future. A government ordinance has been issued in this regard.
Web News Title: Story New order issued by Maharashtra government from April 1 the government bank accounts in the nationalized bank News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार