3 महिने कोणत्याही कर्जाचे हफ्ते भरायची चिंता करू नका: आरबीआय
मुंबई, २७ मार्च: कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. देशातील गरीब आणि कामगारवर्गासाठी केंद्र सरकारने गुरुवारी १ लाख ७० हजार कोटींची योजना जाहीर केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करुन उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून जीडीपीचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठणे कठीण जाणार असल्याचे ते म्हणाले.
तीन महिने ईएमआय स्थगित करा
कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे.
करोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेनं सीआरआर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांचा सीआरआर कमी करून तो ३ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये खेळते होतील, असही दास म्हणाले.
News English Summary : A 21-day lock down has been announced in the country due to the Corona virus. It has hit all the regions of the country. On Thursday, the central government announced a plan of Rs 1 lakh 70 thousand crore for the poor and the working class in the country. On the very next day, RBI Governor Shaktikant Das also tried to bring comfort to the industry and the common people by taking a press conference and cutting the repo rate and reverse repo rate. He said the corona virus would have a big impact on the financial sector and it would be difficult to reach the expected target of GDP. He further said that due to lower interest rates, the loan amount will be reduced. The repo rate has been reduced from 5.15 per cent to 4.4 per cent. The repo rate has been cut by 75 basis points. The reverse repo rate has also been reduced to 90 basis points. Interest rates on short-term loans have been cut.
News English Title: Story No need to pay any EMI says RBI after Corona crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या