21 November 2024 7:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

PM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले

Corona Crisis, Covid19, PM Care Fund, CM Relief Fund

नवी दिल्ली, १२ एप्रिल: पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.

पीएम केअरला दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०० च्या वर गेली आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा धोका पाहता लॉकडाऊन वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार देशाला तीन झोनमध्ये विभागण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ प्रकरणांच्या संख्येच्या आधारावर देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यावर विचार सुरु आहे. झोनमध्ये विभागणी करुन सरकार काही सूट देऊ शकते.

 

News English Summary: The Central Government has made it clear that donations to PM Care will be considered as Corporate Social Responsibility (CSR). The Modi government has said that the money deposited in the Chief Minister’s Assistance Fund will not be calculated in the CSR. In particular, the Center has clarified this after 2 weeks. While Prime Minister Narendra Modi is saying that we will tackle the Corona crisis together, the question is being raised from the corporate sector as to what is the reason for making a difference between PM and CM Relief Fund.

News English Title: Story PM cares qualifies for CSR spend donations but CM Relief fund excluded Modi Government News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x