कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी चीन-अमेरिकेने काय केलं? आणि मोदींनी 'टाळी व थाळी' - सविस्तर वृत्त
मुंबई, २१ मार्च: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनपेक्षाही इटलीमध्ये मृतांची संख्या वाढली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाने ११ हजारांवर बळी घेतले आहेत. तर भारतात अद्याप चार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता असून आज कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी मोठी असल्याने देशासमोर धोक्याची घंटा वाजत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी उद्या, रविवारी देशातील नागरिकांना जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. शासकीय आणि खासगी कंपन्यांनी रविवारी जनता संचारबंदीनिमित्त आपले कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये. आपापल्या घरातच राहावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसमुळे देशातील परिस्थिती तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेली असताना देखील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद न करता “COVID-19 इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स” स्थापून इथेही वेळकाडूपणा केला आहे.
केवळ समाज माध्यमांवर #जनताकर्फ्यू नावाने कॅम्पेन राबवून १४ तास भारत बंद ठेवून कोरोना आटोक्यात येणार या स्वप्नात भारतीयांना नाहून काढलं आहे. त्यात मोदींनी आपत्तकालीन परिस्थितीत राबणाऱ्यांचा ‘टाळ्या-थाळी’ वाजवून आभार माना असं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांनी सध्या थाळ्या आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग टीमदेखील घरात सज्ज ठेवली असणार. मात्र ती मोदींची कल्पना नसून इटलीतील घटना स्वतःच्या कल्पनांशी जोडून पुन्हा मार्केटिंगचा घाट घातल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. मात्र इटलीने किती वेळा लॉकडाउन केला याची मोदींना माहिती देखील नसावी. तर भारत ते १० तासात कोरोना संपवणार अशीच जणू मार्केटिंग सुरु केली आहे. म्हणजे मोदींनी इटलीतील घटनेला उचललं खरं, मात्र १४ मार्चच्या या घटनेनंतर देखील म्हणजे आज इटलीत कोरोनामुळे परिस्थिती पहिल्यापेक्षा तिप्पट झाली आहे. अगदीच इटलीतील १४ मार्चच्या त्या “टाळी आणि थाळी” व्हिडिओचा पुरावा देखील खाली देत आहोत, तो पूर्ण पाहावा.
दुसऱ्या बाजूला चीन आणि अमेरिकेने कोरोनाच्या पहिल्याच टप्प्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी भल्यामोठ्या आर्थिक तरतुदी करून पायाभूत सुविधा ते अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ठोस आणि जाहीर उपाययोजना केल्याचं पाहायला मिळालं आणि मार्केटिंग-जाहिराबाजीवर वेळ वाया घालवला नाही. म्हणजे ६ मार्च २०२० रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी ८.३ अब्ज डॉलर्सच्या खर्चाच्या बिलावर स्वाक्षरी केली. त्यानंतर १३ मार्च रोजी ट्रम्प सरकारने आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आणि फेडरल सरकारला राज्ये, शहरे आणि प्रांतांना ५० अब्ज डॉलरची आर्थिक मदत वितरित करण्यास परवानगी दिली. १७ मार्च रोजी, कोरोनाव्हायरस’मुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने १ ट्रिलियन डॉलर्सच्या पॅकेजची तरतूद देखील केली.
तर चीनमध्ये पीपल्स बँक ऑफ चायना’ने (पीबीओसी) कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान आर्थिक दिलासा देण्यासाठी अनेक धोरणं लागू केली होती. ३ फेब्रुवारी रोजी पीबीओसी बँकेने रिव्हर्स रेपो ऑपरेशन्समध्ये १७४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ केली. त्यामुळे ४ फेब्रुवारीला यात आणखी ७१ अब्ज डॉलर्सची भर पडली. त्यानंतर ५ मार्च रोजी, चीनी प्रशासनातील अधिका-यांनी कोरोनाव्हायरस संबंधित निधीसाठी ११०.४८ अब्ज युआन (१५.९३ अब्ज डॉलर्स) वाटप केले. त्यानंतर १३ मार्च रोजी चीनच्या मध्यवर्ती बँकेने कोरोनाव्हायरसमुळे देशातील आजारी असलेल्या अर्थव्यवस्थेस मदत करण्यासाठी ७९ अब्ज डॉलरची तरतूद करून अर्थव्यवस्थेला बळ देण्याचा प्रयत्न केला. तर पीपल्स बँक ऑफ चायनाने कोविड -१९’च्या प्रकोपामुळे प्रभावित झालेल्या कंपन्यांना मदत करण्यासाठी ७८.८ अब्ज डॉलर्सच्या राखीव निधीतून मुक्तता करून कोरोना आपत्तीवर मात करण्यासाठी निधी प्राप्त करून दिला.
चीनने तर योग्यवेळी कोरोनाचा धोका ओळखून ३-४ दिवसात भलीमोठी इस्पितळं उभारली आणि समाज माध्यमांवर मार्केटिंग करण्यात वेळ न घालवता जमिनीवर प्रामाणिक प्रयत्न केले. भारतातील लोकं मोदी सरकारकडून ३-४ दिवसात भलीमोठी इस्पितळं उभारण्याची अपेक्षा अजिबात करत नाहीत, कारण सध्या त्यांना भलेमोठे पुतळे बांधण्यातून फुरसत नाही. त्यात मागील ६ वर्षात मोदी सरकारने ‘एम्स इस्पितळा’प्रमाणे एकही इस्पितळ बांधलं नाही आणि कोरोनाशी लढण्यासाठी ते ३-४ दिवसांत बांधतील असं भीषण स्वप्नं देखील कोणी पाहू नये. कारण सध्या त्यांना ट्विट-फेसबुक’वरूनच कोरोना आटोक्यात आणायचा आहे आणि तो देखील १० तासात. कारण ४-५ वेळा अख्खा देश लॉकडाऊन करून ते त्यांचा समाजाला रस्त्यावर आणण्याचं धाडस अजिबात करणार नाही हे देखील सत्य आहे, आणि ते सत्य अनेकांच्या पचनी देखील पडणार नाही.
News English Summery: On March 6, 2020, President Donald Trump signed a spending bill of $8.3 billion to fight the pandemic. On March 13, the USA government announced a state of emergency, allowing the Federal Government to distribute up to $50 billion in financial aid to states, cities, and territories. On March 17, the Trump administration proposed a stimulus package of $1 trillion in order to fight the coronavirus-driven economic slowdown. The Peoples Bank of China (PBoC) has implemented several policies to provide economic relief during the coronavirus outbreak. On February 3, the bank expanded reverse repo operations by $174 billion. It added another $71 billion on February 4. On March 5, the Chinese authorities allocated 110.48 billion Yuan ($15.93 billion) for coronavirus-related funding. On March 13, China’s central bank lauched $79 billion stimulus effort to help the country’s ailing economy. The People’s Bank of China cut reserve requirements for banks that will free up to $78.8 billion in funds that will aid the firms affected by the COVID-19 outbreak. However Till date, Indian government has not announced any stimulus packages for companies or businesses.
News English Title: Story PM Narendra Modi called Janta curfew in India to fight against Corona Crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER