No YES Bank ! मोदी आणि त्यांच्या कल्पनांनी भारतीय अर्थव्यवस्था बुडवली - राहुल गांधी
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे खातेधारकांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहेत, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढायची असल्यास रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीत खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत.
५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे. YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती वाईट झाली. भारतीय स्टेट बँक आणि इतर आर्थिक संस्था YES बँकेला या संकटातून बाहेर काढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी (5 मार्च) दिली. एसबीआयला यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.
दरम्यान, या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. येस बँकेच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘No YES Bank ! मोदी आणि त्यांच्या कल्पनांनी भारतीय अर्थव्यवस्था बुडवली’ असं म्हणत चपराक दिली आहे.
No Yes Bank.
Modi and his ideas have destroyed India’s economy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 6, 2020
‘बँकेच्या व्यवस्थापनाशी आरबीआयने सतत चर्चा करून बँकेचा ताळेबंद सक्षम कसा करता येईल तसे तरलता कशी ठेवता येईल, याबाबत सर्व शक्यता आजमावल्या. आपण विविध गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याचे व त्यात त्यांना यश येणार असल्याचे बँकेने आरबीआयला सांगितले होते. १२ फेब्रुवारी रोजी बँकेने शेअर बाजारांना सांगितल्यानुसार, बँक काही खासगी इक्विटी कंपन्यांकरवी भांडवल मिळवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, अखेर बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने आरबीआयने बँकिंग नियमन कायदा कलम ४५ अंतर्गत निर्बंध लागू केले, असे आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे. आरबीआयने येस बँकेचे संचालक मंडळ ३० दिवसांसाठी बरखास्त करून भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
News English Summery: The Reserve Bank has banned this bank. Due to these restrictions, the account holders can withdraw up to Rs. 50000 for a month but will have to get special approval from the Reserve Bank to withdraw more than that amount. Only in exceptional cases can account holders be withdrawn. Accountants will have to get RBI approval if they want to withdraw more than 50 thousand rupees. Accountants can withdraw more than 50,000 rupees for three reasons – medical treatment, foreign education and marriage. However, it would be mandatory to get RBI approval. Debt burden on YES Bank is increasing. This made the bank’s financial situation worse. State Bank of India and other financial institutions can pull YES Bank out of the crisis, sources said on Thursday (March 5). SBI sources said the SBI had been given permission from the Center.
Web News Title: Story Rahul Gandhi slams Modi government after YES Bank crisis.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल