23 February 2025 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

तुम्ही माझा अंत पाहू नका, SBI अध्यक्षांवर सीतारामन संतापल्या

Finance Minister Nirmala Sitharaman, SBI chairman Rajnish Kumar

नवी दिल्ली, १५ मार्च:  देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेचे बिरुद मिरवणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा (SBI) कारभार निर्दयी आणि अकार्यक्षम असल्याचे खडे बोल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या उच्चपदस्थांना सुनावले. २७ फेब्रुवारी रोजी गुवाहाटीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लीप आता समोर आली आहे.

चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांचे २.५ लाख खाते एसबीआयमध्ये अकार्यरत होते. ही गोष्ट निर्मला सीतारामन यांना कळाली आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ऑडिओ क्लीपमध्ये त्या एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांना असं विचारताना स्पष्ट ऐकायला येतं की, “तुम्ही किती वेळात ती सारी खाती पुन्हा कार्यरत करणार आहात?” त्यावर रजनीश कुमार सांगतात की, “यासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी एक आठवडा जाईल.”

रजनीश कुमार यांच्या उत्तरावर निर्मला सीतारामन प्रचंड संतापल्या. तुम्ही माझा अंत पाहू नका. एसबीआयचे अध्यक्ष तुम्ही यासाठी मला दिल्लीत येऊन भेटा. हा मुद्दा मी असाच सोडून देणार नाही. हा कामातील बेजबाबदारपणा आहे. या अपयशासाठी तुम्हीच जबाबदार आहात. दिल्लीत या, आपण यावर सविस्तर बोलू. तुम्ही मजुरांची खाती सुरु करायला पाहिजेत. तुमच्या या आडमुठ्या कारभारामुळे मजुरांचे नुकसान होता कामा नये, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. दरम्यान, सीतारामन यांच्या या वक्तव्याचा ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (एआयबीओसी) असोसिएशनने निषेध केला आहे.

 

News English Summery: Union Finance Minister Nirmala Sitharaman on Monday said that the State Bank of India (SBI), which is the largest public bank in the country, was ruthless and inefficient. Nirmala Sitharaman made this statement during an event in Guwahati on February 27. An audio clip of his speech has now surfaced. SBI accounts of 2.5 lakh workers working in tea mills were inactive. Nirmala Sitharaman learned of this and expressed his anger. In the audio clip, SBI Chairman Rajneesh Kumar gets a clear voice asking, “How long are you going to get those accounts working again?” On this, Rajneesh Kumar says, “This will require permission from the Reserve Bank. It will take a week.

 

News English Title: Story SBI heartless inefficient Finance Minister Nirmala Sitharaman angry over SBI chairman Rajnish Kumar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x