16 January 2025 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

दानशूर रतन टाटा; कोरोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी दान

Tata Trust, Corona Crisis

मुंबई, २८ मार्च: जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत.

टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी ५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.

 

News English Summary: Tata companies and groups have already contributed to the crisis in the country. Even now, this is the time to contribute to the country service. This is the time to contribute to the needs of the present and to contribute more than any other time, Tata said. Ratan Tata has shared a letter from his Twitter account that Tata Group is giving Rs 500 crore for medical equipment and important purchases in the medical field.

 

News English Title: Story TATA trusts has committed Rupees 500 crores to fight corona virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x