17 January 2025 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: APOLLO Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
x

सामान्य खातेदार अंधारात; पण गुजरातच्या कंपनीने १ दिवस आधी काढले तब्बल २६५ कोटी

YES Bank Crisis, Vadodara Smart City Company

गांधी नगर: रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे खातेधारकांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहेत, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढायची असल्यास रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीत खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत.

५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे. YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे.

आरबीआय’च्या धडक कारवाईपासून केवळ सामान्य ग्राहक नव्हे काही सरकारी आणि पालिका स्तरावरील आस्थापने देखील अडकली आहे. त्यामध्ये नाशिक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचा देखील समावेश आहे. मात्र नोटबंदी आणि पीएमसी बँकेच्या वेळी जे अनुभव आणि वृत्त आलं होतं, तसेच प्रकार YES बँकेच्या आणीबाणी’नंतर देखील समोर आलं आहे.

बडोदा पालिकेनं स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटनं येस बँकेवर निर्बंध लादले जाण्यापूर्वी २६५ कोटी रुपये काढले. ही रक्कम केंद्राकडून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बडोदा महापालिकेचे उपआयुक्त सुधीर पटेल यांनी दिली. ‘केंद्रानं स्मार्ट प्रकल्पासाठी अनुदान दिलं. ती रक्कम आम्ही येस बँकेच्या स्थानिक शाखेत जमा केली होती. मात्र बँकेसमोर आर्थिक समस्या असल्याचं लक्षात येताच आम्ही तो निधी बँक ऑफ बडोदात जमा केला,’ असं पटेल यांनी सांगितलं.

दुसरीकडे आंध्र प्रदेशातल्या तिरुमला तिरुपती देवस्थानानंसुद्धा काही दिवसांपूर्वीच येस बँकेतून मोठी रक्कम काढली होती. तिरुपती देवस्थानानं येस बँकेतून १३०० कोटी रुपये काढले होते. ऑक्टोबरमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली होती. त्यामध्ये येस बँकेत जमा असलेली रक्कम इतरत्र गुंतवण्याचा निर्णय झाला. तिरुमला तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी काही बँकांच्या ताळेबंदांचा अहवाल पाहून त्यातले धोका लक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांनी येस बँकेतली रक्कम काढण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना RBI’च्या कारवाईपूर्वी असा निर्णय घेण्यासाठी काही वरच्या पातळीवरील लोकांकडून पूर्व कल्पना दिली गेली असावी असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

 

News English Summery: Baroda Smart City Development, set up by the Baroda Municipal Corporation for the Smart City project, raised Rs 265 crore before imposing restrictions on Yes Bank. The money was sent by the Center for the Smart City project, ”said Sudhir Patel, CEO of Baroda Smart City Development and Deputy Commissioner of Baroda Municipal Corporation. ‘The Center grants for the smart project. We deposited the amount at the local branch of Yes Bank. However, when we realized that there was a financial problem with the bank, we deposited the funds in the Bank of Baroda, ”said Patel. A few days ago, a large amount of cash was also withdrawn from Tirupati Devanathan in Tirum, Andhra Pradesh. Tirupati Devasthan had withdrawn Rs 1300 crore from Yes Bank. In October, there was a meeting of the Board of Trustees of Tirupati Devasthan. It was decided to invest the money deposited in Yes Bank elsewhere. Tirumala is the president of Tirupati Devasthan. V Subba Reddy had noticed the risks in view of some bank balance sheet reports. He then decided to withdraw money from Yes Bank.

 

Web News Title: Story Vadodara company withdrew rupees 265 crore from YES Bank a day before RBI Moratorium.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x