23 February 2025 12:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोरोना आपत्तीमुळे १९३० नंतर प्रथमच जगात महामंदी येणार - IMF

IMF Chief Kristalina Georgieva, Corona Crisis, Covid19

न्यूयॉर्क, १० एप्रिल: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने राज्य हेल्थ सिस्टम सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण फंड देण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने इंडिया कोव्हिड-१९ रिस्पॉन्स हेल्श सिस्टिम पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये खर्चासाठी देण्यात येणारी पूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि संसाधन अधिक उत्तम करण्यासाठी या पॅकेजची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२४ पर्यंत तीन टप्प्यामध्ये या पॅकेजची विभागणी करण्यात आली आहे. यादरम्यान केंद्र सरकार राज्य सरकारांना मदत करणार आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील जगाला सज्ज राहण्याच्या इशारा दिला आहे.

जगभरातील देशांना कोरोना विषाणूने घेरले आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. २०२० मध्ये जागतिक विकास वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण करेल, असेही त्यांनी म्हटले.

त्या पुढे म्हणाल्या की, २०२० मध्ये जागतिक विकास नकारात्मक होईल, हे आधीच स्पष्ट आहे. वास्तविक आपल्याला या मोठ्या मंदीनंतर सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागू शकतो. ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोना विषाणूमुळे जगातील अर्थव्यवस्थेत १९३० च्या महामंदीनंतरची सर्वांत मोठी घसरण दिसू शकते. जग या संकटाच्या कालावधीवरुन अनिश्चित आहे. पण हे आधीच स्पष्ट झाले आहे की, २०२० मध्ये जागतिक वृद्धी दरांत मोठी घसरण होईल.

त्या पुढे म्हणाल्या की, आमच्या १६० सदस्य देशातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न वाढेल, असा आमचा तीन महिन्यापूर्वी अंदाज होता. आता सर्वकाही बदलले आहे. आता १७० हून अधिक देशातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न घटण्याचा अंदाज आहे. या आर्थिक संकटामुळे कमकुवत देशांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उभरत्या बाजारपेठा आणि कमी उत्पन्न असलेले आफ्रिकन, लॅटिन अमेरिका आशियातील बहुतांश क्षेत्रात अधिक जोखीम आहे.

 

News English Summary: Countries around the world are infected with the corona virus. Meanwhile, the International Monetary Fund’s (IMF) chief, Christina Jarriva, said the world is likely to face the worst economic decline since the Great Depression of 1930. Global growth will be negatively accelerated in 2020 and the income growth of individuals in more than 170 countries will move in that direction, he said.

News English Title: Story world faces worst crisis since great depression says IMF Chief Kristalina Georgieva Corona Crisis Covid19 News English Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x