अनिल अंबानींच्या कंपनीने YES बँकेचं १२,८०० कोटींचे कर्ज परत केले नाही
मुंबई, १६ मार्च : हजारो कोटींचा बॅँक घोटाळा करून खातेदारांना आर्थिक संकटात टाकलेल्या येस बॅँकेचा संस्थापक राणा कपूर, पत्नी बिंदू कपूरसह तिघांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने (सीबीआय) आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अमृता शेरगिलच्या बंगल्याच्या व्यवहारात घोटाळा केल्याचे स्पष्ट झाल्याने कपूर दाम्पत्यासह त्यांचा साहाय्यक गौतम थापरविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राणा कपूर मागील रविवारपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असून सोमवार, १६ मार्चपर्यंत कोठडीची मुदत आहे.
दरम्यान, येस बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने आता मोठ्या कर्जदारांनाही समन्स बजावणं सुरू केलं आहे. रिलायन्स समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने त्यांना येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी चौकशी करताना समन्स बजावलं आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयात अनिल अंबानी यांची चौकशी केली जाईल.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनिल अंबानी यांना सोमवारी मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांनी प्रकृती चांगली नसल्याचे कारण देत चौकशीसाठी हजर होण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीकडून त्यांना चौकशीसाठी नवीन तारिख देण्यात आली आहे. रिलायन्स समूहाच्या कंपन्यांनी येस बँकेकडून जवळपास १२,८०० कोटींचे कर्ज घेतले होते. ते त्यांनी परत केले नाही.
Enforcement Directorate officials: Reliance Group Chairman Anil Ambani has filed an adjournment application and has sought more time to appear before the Enforcement Directorate after ED summoned him in connection with its probe against Yes Bank founder Rana Kapoor and others. pic.twitter.com/vjT69pHyNB
— ANI (@ANI) March 16, 2020
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत सांगितले होते की, अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप, एस्सेल ग्रुप, आयएलएफएस, डीएचएफएल आणि वोडाफोन या ग्रुपने आर्थिक संकटात साडलेल्या येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या सर्व मोठ्या कंपन्यांनी येस बँकेकडून कर्ज घेतले आणि ते परत करु शकले नाहीत अशा कंपन्यांच्या प्रवर्तकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
News English Summery: ED, which is investigating the money laundering case against some including Yes Bank founder Rana Kapoor, issued a summons to Reliance Group chairman Anil Ambani. ED officials reported the matter on Monday. Reliance is also among the companies that borrowed heavily from Yes Bank in the financial crisis. ED officials said Anil Ambani was summoned to the ED’s office in Mumbai on Monday for questioning. However, according to sources, Anil Ambani refused to appear for inquiry, citing reasons that his nature was not good. Therefore, the ED has given them a new date for inquiry. Reliance Group had borrowed around Rs 128,000 crore from Yes Bank. They did not return it.
News English Title: Story YES Bank crisis case Anil Ambani Reliance Summoned by ED News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील