YES BANK - राणा कपूर यांच्या मुलीला मुंबई विमानतळावरच रोखले
मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या संपूर्ण कुटुंबियांविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. या नोटीसच्या आधारावर राणा कूपर यांची मुलगी रोशनी कपूर यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आले आहे. येस बँक गैरव्यवहार प्रकरणात रोशनी कपूर यांच्यावरही संशयाची टांगती तलवार आहे. त्यांच्या नावाने असलेल्या कंपनीलाही येस बँकेने कर्ज दिले आहे. रविवारी संध्याकाळच्या दरम्यान मुंबई विमानतळावरुन रोशनी या ब्रिटीश एअरवेजच्या विमानाने लंडनला कूच करणार होत्या. मात्र त्यांना रोखण्यात आले असून त्यांना घरी परतावे लागले.
राणा कपूर यांची पत्नी आणि मुलगी रोशनी यांना रविवारी रात्री १० वाजल्यापासून तीन तास चौकशी करण्यात आली. ईडी ऑफिसमध्ये ही चौकशी करण्यात आली. राणा कपूर यांच्यासोबत कुटुंबियांची देखील कसून चौकशी केली. मुलगी रोशनीला मुंबई एअरपोर्टवर रोखण्यात आलं. रोशनी ब्रिटीश एअरवेजमार्फत लंडनला जात होती. तेव्हाच तिला एअरपोर्टवरून ताब्यात घेण्यात आलं.
तत्पूर्वी, मुंबईच्या विशेष हॉलिडे कोर्टाने येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत प्रवर्तन संचालनालयाकडे कोठडी सुनावली आहे. ईडीने रविवारी पहाटे राणा कपूरला अटक केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली आणि आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
News English Summery: A lookout notice has been issued against the entire family of Yes Bank founder Rana Kapoor. Rana Cooper’s daughter Roshni Kapoor has been barred from traveling to London on the basis of this notice. Roshni Kapoor also has a hanging sword in the Yes Bank misconduct case. Yes Bank has given a loan to a company named after them. On Sunday evening, Roshni was traveling from London airport to London via British Airways. But they were stopped and had to return home.
Web News Title: Story YES Bank founder Rana Kapoors daughter Roshni Kapoor stopped from leaving the India at Mumbai Airport.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे