22 November 2024 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

YES बँकेवरील निर्बंध बुधवारी ६ वाजल्यापासून मागे घेणार - RBI

RBI Governor Shaktikanta Das, RBI, YES Bank Crisis

मुंबई, १६ मार्च : येस बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर अर्थ मंत्र्यांनी सांगितलं होतं की, अर्थ मंत्रालयाकडून लवकरच येस बँक प्रकरणात नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. हे नोटिफिकेशन आल्यानंतर ३ दिवसांच्या आत येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. ३ दिवसांमध्येच मोरेटेरियम पीरियड संपवण्यात येईल.

येस बँकेची आर्थिक स्थिती खराब असूनही कर्ज वितरण केल्याप्रकरणी बँकेचे महाव्यवस्थापक सुनील कदम यांना निलंबित करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ७,२५० कोटी आणि एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सीस व महिंद्रा बँक मिळून ३,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे आरबीआयने येस बँकेवरील निर्बंध येत्या १८ तारखेला उठविण्याचे जाहीर केले आहे. परिणामी, सहकारी बँकांसह इतर खातेदार आणि ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे.

आज एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, येस बँकेतील खातेदारांचे पैसे संपूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. खातेदारांनी या बँकेतील आपले पैसे काढून घेण्याची घाई अजिबात करू नये आणि विनाकारण ताण घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. खातेदारांचे हित लक्षात घेऊनच या बँकेच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. २६ मार्चला येस बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्त्वात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

News English Summery: This is good news for bank account holders. After a cabinet meeting a few days ago, the finance ministers had said that a notification would be issued by the finance ministry on the Yes Bank case soon. Within 3 days of receipt of this notification, restrictions on Yes Bank will be lifted. Within 3 days, the Mauritium Period will be terminated. Yes Bank’s general manager Sunil Kadam has been suspended for disbursing the loan despite the financial condition of the bank. State Bank of India will invest Rs 7250 crore and HDFC, ICICI, Axis and Mahindra Bank together with Rs 3100 crore. Therefore, the RBI has announced to lift the ban on Yes Bank on the 18th. As a result, co-operative banks as well as other accountants and depositors have been relieved.

 

News English Title: Story YES bank moratorium to be lifted on March 18 at 6 PM RBI Governor Shaktikanta Das.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x