15 January 2025 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Sukanya Samriddhi Yojana | लेकीच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता मिटली, या योजनेत पैसे गुंतवूण लेकीचं आयुष्य सेट करा

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana | भारत सरकारने महिलांसाठी आतापर्यंत विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. योजनांमधून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे ही एकमेव भावना महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये आहे.

अशातच भारत सरकारकडून सुरू असणाऱ्या आणखी एक योजनेचं विशेष कौतुक आहे. ज्या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असं आहे. योजना खास मुलींकरिता बनवली गेली आहे. बऱ्याच पालकांना आपल्या लेकीच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता सतावत असते. कारण की उच्च शिक्षण आणि लग्न समारंभ या गोष्टींसाठी भरपूर पैसा महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीला आईने वेळेला मोठा फंड जमा करता येत नाही. याकरिता तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार नक्कीच करू शकता. चला तर जाणून घेऊया योजनेबद्दल सर्व माहिती.

कमी वेळेत करू शकता मोठी बचत :
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना लहान बचत योजना आहे. यामध्ये तुम्ही कमी कालावधीसाठी पैसे गुंतवणूक जास्तीत जास्त लाभ मिळवू शकता. तुमच्या मुलीच्या भविष्याची आणि तिच्या लग्नाची चिंता दूर करणारी ही योजना आहे.

SSY मध्ये किती टक्के व्याजदर दिले जाते :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही 1961 च्या 80C कायद्यानुसार जमा केलेल्या गुंतवणुकीवर 8.2% ने व्याजदर मिळवू शकता. जास्तीचे व्याजदर उपलब्ध असल्याकारणाने तुम्ही कमी कालावधीतच जास्तीत जास्त फंड जमा करू शकता. जेणेकरून तुमच्या लेकीचं आयुष्य सेट करण्यास मदत होईल.

योजनेत किती रक्कम जमा करू शकता :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 250 तर जास्तीत जास्त 1.5 लाखांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे गुंतवून भली मोठी रक्कम जमा करू शकता. जमा केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिकदर 8.2% असल्यामुळे उच्च व्याजदर मिळण्यास मदत होते. ज्यामध्ये सामान्य नागरिकांना प्रचंड लाभ मिळतो.

रक्कम जमा करण्याचा कालावधी किती आहे :
तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, या योजनेत तुम्ही कधीपर्यंत रक्कम जमा करू शकता. तर, तुमच्या मुलीचं 21 वय होईपर्यंत हे खातं सक्रिय राहते. म्हणजेच काय तर, तुम्ही गुंतवणूक केलेल्या तारखेपासून ते पुढील 21 वर्षापर्यंत तुमच्या अकाउंट सुरू असणार. त्यातही तुम्हाला केवळ 15 वर्षांकरिता रक्कम जमा करावी लागते. पुढे 21 वर्ष होईपर्यंत तुम्हाला सातत्याने व्याज मिळत राहते जेणेकरून तुमच्या मुलीच्या खात्यात तिच्या नावाने भरपूर मोठा फंड जमा होऊ शकतो.

अकाउंट अंडर डिफॉल्ट झाल्यावर काय करावे :
आर्थिक अडचणींमुळे तुमच्याकडून योजनेमध्ये वेळोवेळी गुंतवणूक झाली नाही तर, तुमचं खातं ‘अकाउंट अंडर डिफॉल्टमध्ये’ स्थगित करण्यात येत. तुम्ही हे खातं पुन्हा सुरू देखील करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला मागील थकबाकी जमा करावी लागेल. सोबतच दंड स्वरूपात तुमच्याकडून प्रति वर्ष 50 रुपये आकारण्यात येतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं हे खातं पुन्हा 15 वर्षांसाठी सक्रिय करून घेऊ शकता.

2 मुलींकरिता उघडू शकता स्वतंत्र खातं :
समजा एका घरात दोन मुली आहेत तर त्यांचे आई-वडील दोन वेगवेगळे स्वतंत्र खाते देखील उघडू शकतात. दरम्यान त्या घरामध्ये जुळ्या मुलींचा जन्म झाला तर तिसरे खाते देखील उघडण्यात येऊ शकते. या योजनेमध्ये महिलांना टॅक्स सूटचा लाभ देखील मिळतो.

अशा पद्धतीने उघडा योजनेमध्ये खातं :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपल्या मुलीचं खातं उघडण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जवळील पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेमध्ये जाऊन अकाउंट ओपन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन नेट बँकिंगच्या सुविधेनुसार ऑनलाइन सेटअप देखील करू शकता. ज्यामध्ये जन्म प्रमाणपत्र, वडीलधाऱ्या व्यक्तींचे म्हणजेच पालकांचे आयडी प्रुफ, योग्य पत्त्याचं आयडी प्रुफ आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह तुम्हाला या योजनेमध्ये खातं उघडता येऊ शकतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Sukanya Samriddhi Yojana 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Sukanya Samruddhi Yojana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x