18 January 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज
x

टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी'साठी आधार कार्डची मागणी बंद करण्याचे आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सर्व टेलिकॉम कंपन्यांना आदेश जरी केले आहेत. त्यानुसार मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी अथवा नवीन सिम कार्ड कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना ई-केवायसी’च्या नावाने ग्राहकाकडे आधार कार्डची मागणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी हे तसे अधिकृत निर्देश सर्व टेलिकॉम कंपन्यांना जारी केले आहेत.

मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटलं होत की, ‘कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे खासगी कंपन्यांद्वारे होणारा आधार ई-केवायसी’चा वापर करणं बंद करण्यास सांगितले होते. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांसाठी तपशीलवार निर्देश जारी केले आहेत आणि त्याचे काटेकोर पालन केले जावे असं म्हटलं आहे. यामध्ये देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ई-केव्हायसीचा वापर करणं थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, यासंबंधीचा संपूर्ण अहवाल ५ नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितला आहे.

केंद्रीय दूरसंचार विभागानं आपल्या तीन पानांच्या परिपत्रकात नमूद केले आहे की, ग्राहकांच्या खासगी माहितीच्या पडताळणीसह त्यांना नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी आधार ई-केवायसी’चा उपयोग केला जाऊ शकत नाही. दरम्यान, परंतु ग्राहक जर स्व-ईच्छेनं आधार कार्डची प्रत देत असेल तर कागदपत्रांच्या स्वरुपात त्याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु, याचा केवळ ऑफलाइनच वापर केला जाऊ शकतो.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x