5 December 2024 7:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

प्रचंड तोट्यातील व्होडाफोन कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याची शक्यता

Vodafone India, Airtel, Jio Internet, Idea Cellular, MTNL, BSNL

नवी दिल्ली: भारतातील आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. व्होडाफोन कंपनीला भारतात मोठा तोटा सहन करावा लागत असून त्यामुळेच ही कंपनी भारतातील सेवा बंद करण्याची शक्यता असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, कंपनीकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य सुविधांमुळे इतर दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्यांना या शर्यतीत टिकाव धरता आला नसल्यानं त्यांनीदेखील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. तसंच यानंतर व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं मर्जरदेखील झालं होतं. सध्या व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्रित सेवा पुरवत आहे. परंतु आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार व्होडाफोन कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळे कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळेच कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागत आहे.

व्होडाफोन इंडिया व आयडिया सेल्युलर या कंपन्यांच्या विलीनीकरणाला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने (NCLT) परवानगी दिली. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१८ रोजी या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झालं. या विलीनीकरणानंतर व्होडाफोन-आयडिया ही नवी मोबाइलसेवा पुरवठादार कंपनी जन्माला आली. या विलीनीकरणामुळे भारती एअरटेल ही कंपनीसुद्धा दुसऱ्या स्थानावर फेकली गेली. अंबानींच्या जिओने मोबाइलसेवेत केलेल्या नवनव्या प्रयोगानंतर व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या दोन्ही कंपन्यांवर कर्जाचा बोजा वाढत असल्यानं अस्तित्वासाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x