4 November 2024 11:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

कंफेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्सचा चीनी वस्तूंच्या बहिष्कारासाठी पुढाकार

The Confederation of All India Traders, CAIT campaign, against Chinise products

नवी दिल्ली, ८ जून: भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी आमच्या वस्तूंबद्दल अफवा पसरवतायत. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्यायत. हा ७ हजार कोटींहून देखील मोठा व्यवसाय आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये या संदर्भात वृत्त आले आहे.

भारतात काही अतिराष्ट्रवादी चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवण हे काही पहिल्यांदाच होतं नाहीय. पण हे करणं तोट्याचं ठरु शकतं. सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ आणि रिमूव्ह चायना एप एप्लीकेशनवर देखील चीनने भाष्य केलंय. चीनच्या तक्रारीनंतर हे एप्लीकेशन प्ले स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. स्मार्टफोनमधून चीन एप डीलीट व्हावे या उद्देशाने हे बनविण्यात आले होते.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभुमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा आवाज भारतीय नागरिकांमधून उठतोय. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत. असे केल्यास चीनच्या आर्थिक बाजु कमजोर करु शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. कंफेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स (CAIT) यामध्ये अग्रेसर आहे. १० जूनपासून कॅटतर्फे देशभरात मोठे अभियान चालवले जाणार आहे. हे अभियान पंतप्रधान मोदींच्या ‘वोकल फॉर लोकल’ संकल्पनेस प्रोत्साहन देणारे असल्याचे सांगण्यात येतंय.

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात व्यापारी वर्गाची मोठी मदत होणार आहे. अशा वस्तू आयात झाल्या नाहीत तर खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंमधून १.५ लाख कोटी रुपये कमी करण्याचा कॅटचा मानस आहे. ज्या वस्तू भारतात आल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही अशा ३ हजार चीनी वस्तूंची यादी कॅटने बनवली आहे. या वस्तू भारतात पुर्वीपासून बनतायत. त्याच्या विक्रीवर भर देण्याचे आवाहन व्यापारी वर्गाला करण्यात येत असल्याचे कॅटचे राष्ट्रीय मंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगिले. भारतीय व्यापाऱ्यांनी याचा संकल्प केला असून एका रात्रीत हे काम होणार नसल्याचेही ते म्हणाले.

 

News English Summary: The Confederation of All India Traders (CAIT) is a leader in this. From June 10, CAT will launch a major campaign across the country. The campaign is said to promote Prime Minister Modi’s ‘Vocal for Local’ concept.

News English Title: The Confederation of All India Traders CAIT campaign against Chinise products News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x