7 January 2025 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663 HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत होणार नाही, या फंडाता गुंतवा, दरवर्षी 50 टक्क्यांनी पैसा वाढवा, पैशाने पैसा वाढवा
x

कोरोना लस | मुकेश अंबानींची रिलायन्स लाईफ सायन्सेसही शर्यतीत

covid19 vaccine, Reliance Life Sciences, Mukesh Ambani

मुंबई, ७ ऑक्टोबर : रिलायन्स लाईफ सायन्सला मिळालेल्या मान्यतेनंतर याच महिन्यापासून जनावरांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. कपंनीनं लस विकसित करण्यासाठी एक व्यापक योजनादेखील तयार केली आहे. यामध्ये टेस्ट किट तयार करण्यापासून, चाचणी केंद्र चालवणं, लस विकसित करणं आणि त्याचं वितरण यांचा समावेश आहे. रिलायन्स कोविड १९ साठी जी लस तयार करत आहे ती रिकंबिनेंट प्रोटिन बेस्ड लस आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“छोट्या जनावरांवर याची चाचणी इन हाऊस केली जाणार आहे. यामध्ये भागीदार संशोधक कंपनीदेखील सहभागी होणार आहे. मानवी चाचणी कंपनीची अंतर्गत संशोधन सेवा संस्था करेल,” अशी माहिती रिलायन्स लाईफ सायंसेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के.व्ही सुब्रमण्यम यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. या दरम्यान व्हॅक्सीनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक आनंदाची बातमी दिली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांच म्हणणं आहे की,’एक सुरक्षित आणि कारगर व्हॅक्सीन यावर्षाच्या शेवटापर्यंत तयार होऊ शकते.’ यासोबतच ते म्हणाले की, जगातील सर्व राजकीय मंडळींना व्हॅक्सीनचं समान वितरण करण्यास सांगितल्याचं म्हणाले.

WHO च्या बैठकीत टेड्रोस म्हणाले की,’आपल्याला व्हॅक्सीनची गरज आहे. आशा आहे आपल्याला या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळेल. आपल्याला एकमेकांची गरज आहे. व्हायरसशी लढण्यासाठी खूप उर्जेची गरज आहे.’

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, ९ कोरोना व्हॅक्सीन पाइपलाइनमध्ये आहे. त्यामुळे लस बाजारात आल्यावर त्याचं समान वाटप होणं हे आव्हान आपल्यासमोर आहे. आतापर्यंत १६८ देश या कोवॅक्स फॅसिलिटीत सहभागी झाले आहेत. फक्त चीन, अमेरिका आणि रशिया या देशांचा यामध्ये समावेश नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंता वाढली आहे. सोमवारी तज्ञांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. ‘जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.’ WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते.

 

News English Summary: The vaccine will be tested on animals from this month following the approval of Reliance Life Sciences. The company has also developed a comprehensive plan to develop the vaccine. This includes everything from making test kits, running test centers, developing vaccines and distributing them. The vaccine that Reliance is developing for Covid 19 is a recombinant protein based vaccine. Human testing of the vaccine could begin by the first quarter of next year.

News English Title: The covid19 vaccine will be tested on animals from this month following the approval of Reliance Life Sciences Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Mukesh Ambani(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x