23 February 2025 2:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबेना, महागाईचा उडणार भडका

Petrol Diesel, Fuel Rates

नवी दिल्ली, १९ जून : गेल्या १३ दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. परिणामी लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसलेला असतानाच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल ५६ पैशांनी महागले असून डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता प्रति लिटर पेट्रोलमागे ७८.३७ रुपये, तर प्रति लिटर डिझेलमागे ७७.०६ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच मुंबईत पेट्रोलचे दर ८५.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७५.५३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५६ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६३ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७८.३७ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर ७७.०६ रुपयांवर पोहोचली.

लॉकडाऊनमुळे सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल घटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरुन आता राजकारण अधिक पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात देखील वाढ केली. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: The fuel price hike season has been going on for the last 13 days. As a result, while the lockdown has taken a heavy toll, fuel prices have hit the pockets of the common man. Even today, petrol and diesel prices have gone up. Today, petrol has gone up by 56 paise and diesel by 63 paise.

News English Title: The fuel price hike season has been going on for the last 13 days News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x