22 December 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

पेट्रोल, डिझेल आजही महागले....सामान्यांची आर्थिक अडचण वाढली

Petrol, Diesel, Price Hike

मुंबई, १५ जून : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे इंधनाचे दर महागले आहेत. आज सलग नवव्या दिवशी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात ४८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ८३.१७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७३.२१ रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहेत.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे दर ७६.२६ रुपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७४.६२ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तेव्हापासूनच हे नवे दर लागू करण्यात येतात.

सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.२६ रूपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ७४.६२ रूपये प्रती लीटर इतके झाले आहेत. तर मुंबईतही पेट्रोलचे दर ८३.१७ रूपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ७३.२१ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ७९.९६ रूपये प्रती लीटर आणि ७२.६९ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ७८.१० रूपये प्रती लीटर आणि ७०.३३ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.

 

News English Summary: Demand for petrol and diesel has been on the rise since the lockdown. As a result, fuel prices have skyrocketed. Today marks the ninth consecutive day that the country’s petroleum companies have hiked petrol and diesel prices. Today, petrol price in Mumbai has been increased by 48 paise and diesel by 59 paise.

News English Title: The ninth consecutive day that the country petroleum companies have hiked petrol and diesel prices News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x