14 January 2025 1:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

समुद्रच नसलेल्या १५ देशात ३२ रिफायनरीज.

मुंबई : कोकणातील नाणार रिफायनरीवरून राज्यात सध्या वातावरण तापलं असताना आणि ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असं राज्याचे प्रमुख सांगू लागले. परंतु रिफायनरी बाबतचे जगातील वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे सुंदर निसर्ग लाभलेल्या कोकणात निसर्गाचा ऱ्हास करून असं प्रकल्प अर्धवट ज्ञानावर का लादले जात आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसनपूर्वी शिवसेनेच्या नाणार संदर्भातील टीकेला उत्तर देताना ‘रिफायनरी हवी असेल तर विदर्भात समुद्र आणा, मी रिफायनरी देतो’, असे विधान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले होते. त्याला पुन्हा प्रतिउत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी टोला लगावलाहोता की, नरेंद्र मोदी समुद्र सुद्धा आणू शकतात विदर्भात. परंतु रिफायनरी उभी करण्याआधी खरंच रिफायनरी प्रकल्प उभा करण्यासाठी जवळच समुद्र असणं गरजेचं असत का ? आणि त्याचा प्रतिक्रिया देणाऱ्या राजकारण्यांनी कधी अभ्यास किंव्हा विषय समजून घेतला होता का प्रश्न उपस्थित होतो.

कारण सध्या जगात एकूण ६८० रिफायनरीज कार्यरत आहेत. परंतु रिफायनरीसाठी समुद्र आवश्यकच आहे असे नाही हे समोर आलं आहे. कारण जगात असलेल्या ६८० रिफायनरीज पैकी ३२ रिफायनरीज अशा १५ देशात आहेत की त्या देशांमध्ये समुद्र किनाराच नाही. केवळ पेट्रोलियम रिफायनरीमध्ये क्रूड आॅईलचे बाष्पीभवन करून त्यापासून पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस, पेट-कोक आणि पेट्रोकेमिकल्स अशी तब्बल १४३ उत्पादने प्राप्त केली जातात. परंतु बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत भरपूर पाणी आवश्यक असते त्यामुळे रिफायनरी समुद्र किनाऱ्यालगत असावी असे ब्रिटिश काळात रूढ झालं होते.

ब्रिटिश काळात क्रूड आॅईलची वाहतूक फक्त समुद्री जहाजातून होत असल्यामुळेही रिफायनरी वाहतुकीच्या कारणांमुळे समुद्र किनारी टाकल्या जात होत्या. परंतु तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे. नवीन आधुनिक रिफायनरीमध्ये बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत पाणी कमी लागते. तसेच ज्या देशांजवळ समुद्र किनारा आहे, अशा काही देशांमध्येही पेट्रोलियम रिफायनरी समुद्रापासून दूरच्या भागात उभारल्या गेल्याची उदाहरणे पहायला मिळतात कारण त्यामुळे निसर्गाला कोणतीही हानी होऊ नये म्हणून ते दूर अंतरावर उभारले जातात.

वाहतुकीचा खर्च विचारात घेता असे निर्णय घेतले जातात आणि त्यात निसर्ग या विषयाला संपूर्ण बगल दिली जाते. कारण काळाच्या ओघात क्रूड आॅईलची वाहतूक पाइपलाइनद्वारे होऊ लागली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रेल्वेने क्रूड आॅईलचा वाहतूक खर्च लिटरला ४ रुपये पडतो तर पाईपलाईनद्वारे केवळ ३० पैसे खर्च येतो आणि त्यात पैशाची प्रचंड बचत होत आहे हेच गुंतवणूक करणाऱ्या मुख्य उद्देश असत हे सिद्ध होतं. मुळात आपल्या देशातील राजकारणी किती निसर्ग प्रेमी आहेत हे तेंव्हाच ध्यानात जेंव्हा कोकणासारख्या निसर्ग संपन्न भूमीत पर्यटन सारखा विषय त्यांच्या डोक्याला स्पर्श सुद्धा करत नाही.

एक स्वित्झर्लंड सारखा निसर्ग संपन्न देश जो कदाचित कोकणच्या आकारा एवढाच असावा, तोच देश केवळ पर्यटन या विषयावर समृद्ध झाला असून त्यांना केवळ पर्यटन या विषयातून किती मोठ्या प्राणावर परकीय चलन मिळतं याची साधी कल्पना सुद्धा आपल्या राजकारण्यांना नसावी. भारतात जशा इतरत्र रिफायनरीज आहेत ताशा त्या स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा आहेत परंतु त्या केवळ गरजे इतक्याच. आपल्या देशातील राजकारण्यांना कल्पना असते ती केवळ येऊ घातलेले प्रकल्पाची आणि त्यातून आधीच पैसा गुंतवून कस झटपट श्रीमंत होता येईल याकडेच लक्ष असतं हे देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल.

जगभरातील समुद्रच नसलेल्या १५ देशातील ३२ रिफायनरीज;

१. अझरबैजान २
२. आॅस्ट्रिया १
३. झेकोस्लोवाकिया ४
४. कझाखस्तान ३
५. स्लोव्हाकिया २
६. स्विर्त्झलंड २
७. तुर्कमेनिस्तान २
८. मॅसिडोनिया १
९. बेलारूस २
१०. चाड १
११. नायझर १
१२. सर्बिया ३
१३. झांबिया १
१४. हंगेरी २
१५. बोलिव्हिया ५

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x