21 January 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ; वाहन धारक हैराण

Petrol Diesel Price Hike

मुंबई, १८ जून : मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आज सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल ५३ पैशांनी, तर डिझेल ६४ पैशांनी महागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता पेट्रोलसाठी ७७ रुपये ८१ पैसे आणि डिझेलसाठी ७६ रुपये ४३ पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच मुंबईत आज पेट्रोल ८४.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८४.३८ रुपये प्रतिलिटर झाले आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागू होतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या किमती या आणखी 2 आठवडे रोज वाढत राहतील. इंधनाच्या किरकोळ किंमतीमध्ये 8 रुपयांपर्यंतची वाढ करून लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई केली जावी अशी तेल कंपन्यांची योजना राहील. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती.

 

News English Summary: The lockdown, which has been going on for the last two and a half months, has hit the country’s economy hard. On the other hand, the daily increase in fuel prices has brought the common man to a standstill. Today is the twelfth consecutive day of fuel price hike. Today, petrol has gone up by 53 paise and diesel by 64 paise.

News English Title: Today petrol diesel prices increase continue 12th day News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x