PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट
नवी दिल्ली, १४ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आज सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार आज 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित राहणार आहेत.
PM किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकली जाते. आतापर्यंत .15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
सूचीमध्ये आपले नाव असे चेक करा
- जर आपण या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर पंतप्रधान किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) वर जाऊन आपले नाव तपासू शकता. नाव तपासण्यासाठी आपण या प्रक्रियेला फॉलो करा.
- सर्व प्रथम पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in भेट द्या.
- वेबसाइट उघडल्यानंतर मेनूबारमधील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.
- येथील लाभार्थी यादीवर क्लिक करा.
- यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावची माहिती प्रविष्ट करा.
- यानंतर आपल्याला Get Report क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.
- या यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकता.
यादीमध्ये आपले नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा
- जर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नसेल तर आपण पीएम किसान या वेबसाइटवरील हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.
- पीएम किसान हेल्पलाईन – 155261
- पंतप्रधान किसान टोल फ्री – 1800115526
- पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक – 011-23381092, 23382401
- ईमेल आयडी [email protected] वर ईमेलद्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते.
News English Summary: Today Prime Minister Narendra Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme as on 14th May at 11 AM
News English Title: Today PM Narendra Modi will release the 8th instalment of financial benefit under Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो