18 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

TRP Scam मुंबई पोलिसांकडून उघड | केंद्राकडून पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन

TRP scam, Modi government, sets up committee

नवी दिल्ली, ०५, नोव्हेंबर: TRP Scam वरून मुंबई पोलिसांनी मोठा घोटाळा समोर आणल्यानंतर आणि त्यातून ठराविक प्रसार माध्यमांनी मांडलेल्या आर्थिक बाजार समोर आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे. मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने TRP घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या संबंधित असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. प्रसार भारतीचे CEO शशी शेखर वेम्पती (Prasar Bharati CEO Shashi Shekhar Vempati) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या ४ सदस्यीय समितीला २ महिन्याच्या कालावधीत त्यांचा सविस्तर लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे मुंबई पोलीसांनी टीआरपी घोटाळा उघड केला आणि त्यासंदर्भातील सर्व पुरावे असल्याचे सांगितल्यानंतर फक्त १ महिन्याच्या आतच मोदी सरकारने हा तडकाफडकी निर्णय जाहीर केला आहे. TRP Scam संदर्भात सध्याची मार्गदर्शक तत्वे ही २०१४ साली तयार करण्यात आली आहेत. त्यावेळी TRAI’च्या आणि केंद्रीय संसदीय समितीने स्थापन केलेल्या शिफारशीने या मार्गदर्शक तत्वांची त्यावेळी अधिकृतपणे निर्मिती करण्यात आली होती.

दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या या समितीने TRP संदर्भातील पूर्वीच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा सखोल अभ्यास करणे, आतापर्यंत या सर्व विषयावर विविध तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांचा विचार करणे आणि उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष कशी राहिल हे पाहणे समितीकडून अपेक्षित आहे. तसेच TRAI’ने नुकत्याच केलेल्या इतर शिफारशींची नोद घेणे या समितीला केंद्राने बंधनकारक केले आहे. मागील महिन्यात शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील एका संसदीय समितीने TRP संदर्भातील सध्याची मार्गदर्शतक तत्वे आणि वापरण्यात येणारे तंत्रज्ञान कुचकामी तसेच कालबाह्य असल्याचे सांगितले होते.

TRP संदर्भात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा देखील सखोल अभ्यास ही समिती करणार आहे. दरम्यान, या समितीत IIT कानपूरचे प्राध्यापक डॉ. शलाभ, सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीचे डॉ. पुलोक घोष आणि सेंटर फॉर डेवलपमेंट टेलिमॅटिक्‍सचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार उपाध्याय यांचा केंद्राने समावेश केला आहे. TRP Scam समोर आल्यानंतर बार्क (BARC) या संस्थेने 2 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या TRP’ला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. आता यावर बार्क (BARC) ची तांत्रिक टीम काम करणार आहे. सामान्य लोकांना पैसे देऊन किंवा त्यांना कोणत्याही स्वरूपात अमिष दाखवून आता अशा प्रकारे रेटिंग वाढवता येणार नाही यासाठी BARC ठोस पावले उचलणार आहे.

 

News English Summary: The Modi government has woken up after the Mumbai Police exposed a big scam over the TRP scam and the financial markets presented by certain media outlets. The Modi government’s Ministry of Information and Broadcasting has set up a committee to review the relevant guidelines in the wake of the TRP scam. The four-member committee, headed by Prasar Bharati CEO Shashi Shekhar Vempati, has been directed to submit a detailed written report within two months.

News English Title: TRP scam Modi government sets up committee to review News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x