22 November 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ए भाई जगताप! मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय - अमृता फडणवीस

Tweeter war, Amrita Fadnavis, Bhai Jagtap, AXIS bank

मुंबई, २३ मार्च: राज्यात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.

महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.

भाई जगतापांच्या सवालाने व्यथित झालेल्या अमृता फडणवीसांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.त्यांनी ट्विट केले आहे की, ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !….पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय !’

 

News English Summary: The BJP has been aggressive in the state for the resignation of Home Minister Anil Deshmukh following a letter from Paramvir Singh, but Pawar ruled yesterday that he would not resign. We got to see the war between Amrita Fadnavis.

News English Title: Tweeter war between Amrita Fadnavis and Bhai Jagtap over AXIS bank issue news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x