28 January 2025 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

१ कोटींपेक्षा जास्त लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड | चांगल्या नोकऱ्यांसाठी तरुणांना १ वर्ष वाट पाहावी लागणार

CMIE job opportunities

नवी दिल्ली, ०१ जून | कोरोना महामारीमुळे देशावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने देशाची परिस्थिती बिकट झाली, तर दुसऱ्या लाटेने एक कोटींपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले. यात 97% पेक्षा जास्त कुटुंबांची कमाईदेखील कमी झाली. प्रायवेट थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) चे CEO महेश व्यास सांगतात की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील बेरोजगारी दर 12% पर्यंत येऊ शकतो.

मागच्या वर्षी देशव्यापी लॉकडाउनमुळे मे महिन्यात बेरोजगारी दर 23.5% वर पोहचला होता. जानकार सांगत आहेत की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक आता संपला आहे. आता राज्ये आर्थिक गोष्टींवर असलेली बंदी हटवतील आणि बेरोजगारी दर कमी होईल.

असंघटीत क्षेत्रांमध्ये नोकऱ्या लवकर मिळतील, पण क्वालिटी जॉब आणि संघटीत क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होण्यासाठी एक वर्ष लागेल. अर्थव्यवस्था हळु-हळू रुळावर येत आहे. यामुळे परिस्थितीत सुधार होईल, पण पुर्ववतः होण्यासाठी वेळ द्यावा लागेल. सध्या मार्केटमध्ये लेबर पार्टिसिपेशन रेट कमी होऊ 40% वर आला आहे. महामारीच्या आधी लेबर पार्टिसिपेशन रेट 42.5% होता.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 3-4% बेरोजगारी दर सामान्य:
अर्थव्यवस्थेचे जानकार व्यास सांगतात की, 3-4% बेरोजगारी दर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सामान्य आहे. येणाऱ्या काळात हा कमी होऊ शकतो. CMIE ने एप्रिलमद्ये 1.75 लाख कुटुंबांवर एक देशव्यापी सर्वे केला होता. या सर्वेंमध्ये मागच्या एका वर्षात केलेल्या कमाईचा त्रासदायक ट्रेंड समोरल आला होता. सर्वेमध्ये फक्त 3% कुटुंबांनी आपली कमाई वाढल्याचे सांगितले, तर 55% कुटुंबांनी कमाई कमी झाल्याचे म्हटले. उर्वरित 42% कुटुंबांच्या कमाईत कुठलाच बदल झाला नाही.

 

News English Summary: The Corona epidemic is having a major impact on the country. The first wave of the Corona worsened the situation in the country, while the second wave left more than a million people unemployed. It also reduced the income of more than 97% of households.

News English Title: Unemployment rate household income centre for monitoring Indian Economy CMIE job opportunities news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x