23 February 2025 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

वर्णभेद आंदोलनानंतर खबरदारी, Fair & Lovely क्रिमचं नाव बदलण्याचा निर्णय

Unilever, Fair and Lovely cream

मुंबई, 25 जून: वर्णभेदावरून अमेरिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यामुळे युनिलिव्हर कंपनीने त्यांच्या फेअर अण्ड लव्हली या क्रिमचं नाव बदलण्याचं ठरवलं आहे. या क्रिमच्या माध्यमातून भारतातून युनिलिव्हर कंपनी जवळपास ५० कोटी डॉलर कमावते. जगभरात वर्णभेद निर्माण झाल्यामुळे वर्णद्वेष संपुष्टात येण्याकरता चेहरा उजळ करणाऱ्या क्रीमच्या जाहिरातींवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे नाव बदलण्याचा निर्णय घेतला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युनिलिव्हर कंपनीने सांगितलं की , फेअर, व्हायटनिंग आणि लायटनिंग असे शब्द त्यांच्या ब्रण्डमधून वगळण्यात येणार आहेत. शिवाय, त्यांच्या जाहीरातीत प्रत्येक रंगाच्या महिलेला स्थान देण्यात येणार आहे. भारताव्यतरिक्त ही क्रीम बांग्लादेश, इंडोनेशिया, थायलंड, पाकिस्तान आणि आशिया खंडातील इतर देशातही विकली जाते.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये सुंदरता आणि गोरेपणा या मुद्द्यावरुन कंपनीच्या या प्रोडक्टला मोठा विरोध होत आहे. अनेक महिला संघटनांनी या प्रोडक्टला विरोध करत, स्त्रीच्या सौंदर्याचं आकलन तिच्या रंगावरुन होऊ नये, असं म्हटलं आहे. या प्रोडक्टमध्ये, गोरेपणा हा शब्द ज्याप्रकारे वापरला जातो, त्यातून असं दिसतं की, केवळ गोरा रंग असलेल्या स्त्रियाचं सुंदर आहेत, असा आरोप संघटनांनी केला आहे.

 

News English Summary: Racism has caused a great deal of tension in the United States. As a result, Unilever has decided to rename their cream Fair and Lovely. Unilever earns about 500 million from India through this cream.

News English Title: Unilever has decided to rename their cream Fair and Lovely News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Fair&Lovely(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x